शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

सत्तारुढ मजबूत; विरोधकांची जमवाजमव

By admin | Published: January 06, 2015 12:18 AM

‘गोकुळ’चे रणांगण : राष्ट्रवादीच्या भूमिकेलाही महत्त्व; सतेज-मंडलिक एकत्र आल्यास डोकेदुखी वाढणार

विश्वास पाटील - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘सवता सुभा’ केल्यास सत्तारुढ गटाची डोकेदुखी वाढू शकते, असे आजचे चित्र आहे. हे दोघे नेते खरेच स्वतंत्र पॅनेल करून लढणार का, याबद्दल साशंकता असली तरी तसे होणारच नाही, असेही म्हणता येत नाही. आजतरी मजबूत सत्तारुढ विरुद्ध विरोधकांची मात्र जमवाजमव अशी राजकीय स्थिती आहे.लोकसभेला मंडलिक व विधानसभेला माजी गृहराज्यमंत्री पाटील यांचा पराभव झाल्याने राजकीयदृष्ट्या त्यांची पीछेहाट झाली आहे. सतेज पाटील यांनी ठराव गोळा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे, परंतु ते पॅनेल करतीलच का याबाबत साशंकता आहे. जर सतेज व मंडलिक यांनी सवता सुभा करायचे ठरविल्यास त्यांना संपतराव पवार, नरसिंगराव पाटील, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जाधव यांच्यासह अन्य छोट्या गटांची मदत मिळू शकते. सतेज पाटील यांच्या गटाचा एक संचालक आता सत्तेत आहे. तो तसाच ठेवून त्यांच्या विरोधाची धार कमी केली जाऊ शकते. मंडलिक यांचा विरोध मुरगूडच्या रणजित पाटील यांना आहे, परंतु त्यांच्या पाठीशी महाडिक व हसन मुश्रीफ असल्याने त्यांना पॅनेलमधून हलविणे शक्य नाही. गेल्या दोन्ही निवडणुकीत सत्तारूढ गट फार कमी मताधिक्यावर निवडून आला आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी सुमारे चारशेहून अधिक नव्या मतदारांची व्यवस्था केली आहे, परंतु अनेक वर्षे सत्तेत असल्यास विद्यमान संचालकांबद्दल लोकांत नाराजीची भावना तयार होते. राजकीय घडामोडी कशा आकार घेतात त्यावरच या संभाव्य घडामोडी अवलंबून आहेत. विद्यमानांनाच संधी शक्यपॅनेलमधून वगळल्यास नाराजी होते म्हणून विद्यमान सगळ््याच संचालकांना पुन्हा पॅनेलमध्ये संधी दिली जाऊ शकते. नेत्यांनीच त्यांच्या पातळीवर त्यांच्या गटातून दिलेल्या जागेवरील व्यक्ती बदलल्यासच काही बदल होऊ शकतो. अगदीच झाल्यास आरक्षणाच्या जागेवरील संचालकांत व्यक्ती बदल संभवतो.भाजपचाही सहभागसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आमदार महादेवराव महाडिक यांचे चांगले संबंध आहेत शिवाय अमल महाडिक भाजपचे आमदारच असल्याने संघात या वेळेला भाजपला प्रतिनिधित्व द्यावे लागेल. स्वीकृत संचालकांतून त्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. श्रीमती जयश्री चुयेकर, सदानंद हत्तरकी यांनाच संधी शक्यसंघाचे दिवंगत नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांचे निधन झाल्यावर ती जागा रिक्त आहे. चुयेकर यांचा आज, सोमवारी स्मृतिदिन होता. त्या कार्यक्रमासाठी गेलेल्या संघाच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी चुयेकर यांचे वारसदार म्हणून मुलगा शशिकांत यांनाच पॅनेलमध्ये संधी द्यावी, अशी विनंती केली; पण आमदार महाडिक यांनी श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित केल्याचे समजते. श्रीमती चुयेकर यांना संधी दिल्यास आमदार सत्यजित पाटील अथवा संजय घाटगे यांच्या कुटुंबातून पुरुष संचालकास संधी मिळू शकते. गडहिंग्लजचे दिवंगत ज्येष्ठ संचालक राजकुमार हत्तरकी यांचा वारसदार म्हणून मुलगा सदानंद यांनाच पॅनेलमध्ये संधी मिळू शकते. ‘राष्ट्रवादी’ला दोन्हीकडे अडचणी...राष्ट्रवादी स्वत: या निवडणुकीत पॅनेल करणार का, याबद्दल साशंकता आहे. गेल्यावेळी हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी ‘गोकुळ’चे ठराव गोळा करण्यात मागे राहिली होती, परंतु आता पक्षाचे नेते माजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी ठराव गोळा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. ठराव किती गोळा होतात यावर निवडणुकीचे काय करायचे हे ठरवू, असे मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सद्य:स्थितीत असे दिसते की, राष्ट्रवादीने महाडिक गटाला जवळ केले तर तिथे पी. एन. पाटील यांच्याशी मुश्रीफ यांचे राजकीय वैर आहे. सतेज पाटील यांना मदत करावी तर तिथे खा. मंडलिक हे त्यांचे पारंपरिक राजकीय शत्रू आहेत.