लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे ते आव्हानात्मक असले तरी शिक्षक सर्व नियमांचे पालन करून काटेकोरपणे शाळा सुरू ठेवतील, असा विश्वास निपाणीच्या क्षेत्र शिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी व्यक्त केला. त्या बेनाडी येथील कन्नड प्राथमिक शाळेत आयोजित बेनाडी व मांगूर सीआरसीअंतर्गत संयुक्तरीत्या गुरु स्पंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर. व्ही. वंटे यांनी प्रार्थना गीत सादर केले. प्रास्ताविक मांगुर सीआरसी प्रमुख सदाशिव तराळ यांनी केले. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे लिपिक प्रवीण माळगी यांनी सेवापुस्तकाविषयी माहिती दिली. यावेळी क्षेत्र शिक्षणाधिकारी मठद यांनी शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन सेवापुस्तकातील त्रुटी दुरुस्ती, तसेच नोंदी करून दिल्या. यावेळी मराठी शाळेचे शिक्षक आर. एम. पाटील, एस. के. हायस्कूलचे मुख्याध्यापक रामाप्पा जोडट्टी, राज्य सरकार नोकर संघाचे प्रतिनिधी संजय खामकर, बेनाडी सीआरसीप्रमुख बी. एस. मगदूम, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक वडगोले, मराठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश हसुरे, बी. आय. मुजावर, आर. व्ही. वंटे, बेनाडी व मांगूरअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी. एस. मगदूम यांनी केले.
फोटो ओळ ०४ बेनाडी कार्यक्रम
बेनाडी येथील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये आयोजित गुरु स्पंदन कार्यक्रमात क्षेत्र शिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी मार्गदर्शन केले.
040921\2012-img-20210904-wa0156.jpg
बेनाडी येथील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये आयोजित गुरु स्पंदन कार्यक्रमात क्षेत्र शिक्षणाधिकारी सौ रेवती मठद यांनी मार्गदर्शन केले