गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा आधारवड असलेल्या ‘ग्रामीण रुग्णालया’चा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवरच उभा आहे. निवासी वैद्यकीय अधिकाºयांसह वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशी एकूण सात पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णांची हेळसांड सुरू आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले व सुदृढ राहावे यासाठी राज्य शासनाने ग्रामीण पातळीवर ग्रामीण रुग्णालये सुरू केली. ज्या गावाची लोकसंख्या जास्त असेल अशा ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालये सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गडहिंग्लज, कोडोली, वसाहत रुग्णालय गांधीनगर व कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय अशी चार उपजिल्हा रुग्णालये आहेत; तर १६ ग्रामीण रुग्णालये आहेत. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारीत ही २० रुग्णालये येतात. त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे (आयजीएम) फेब्रुवारी २०१७ ला ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे हस्तांतरण झाले. त्यामुळे २१ रुग्णालयांचा कारभार जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येतो. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी २६ वैद्यकीय अधीक्षक पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सध्या नऊ पदे रिक्त आहेत. सध्या राधानगरी, आजरा, मलकापूर, नेसरी, गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधीक्षक व महत्त्वाचे म्हणजे २०१४ पासून सीपीआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे. सध्या डॉ. विलास देशमुख यांच्याकडे याचा तात्पुरता पदभार आहे. ते हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. याचा सर्व परिणाम रुग्णांवर होतो आहे. यासाठी प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाºयांची ११ महिन्यांची बंधपत्रित प्रतिनियुक्ती केली जात आहे.दरम्यान, गेल्या दोन-तीन महिन्यांत ग्रामीण भागात सर्पदंश, कुत्रे चावणे व मलकापुरातील अर्भक मृत्यू प्रकरण अशा विविध घटना घडल्या आहेत. पण ग्रामीण रुग्णालयात अपुºया मनुष्यबळाअभावी संबंधित रुग्णांवर उपचार करता शक्य नसते; त्यामुळे बहुतांश रुग्ण हे सीपीआर रुग्णालयाकडे येतात. यासाठी रिक्त झालेल्या जागा भराव्यात, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाइकांकडून होत आहे.गगनबावडा वैद्यकीय अधिकाºयाविनागगनबावडा येथे २०१३ पासून वर्ग दोन वैद्यकीय अधिकारी एक, कागल ग्रामीण रुग्णालय दोन अशी एकूण तीन पदे रिक्त आहेत. याचबरोबर ‘सीपीआर’मधील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रामध्ये वर्ग - एकचे पद रिक्त आहे; तर जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक एक अशी एकूण दोन पदे रिक्त आहेत. या प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांना आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयांचा डोलारा ‘प्रभारीं’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:11 AM