शिरोळ : स्व. सा. रे. पाटील यांनी दिलेल्या आदर्शानुसार सर्व संस्था नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि शेती प्रगतीसाठी दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून भरघोस सहकार्य करण्याची भूमिका ठेवलेली आहे. हे जन्मशताब्दी वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरे केले जाणार असल्याचे ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी सांगितले.
दत्त उद्योग समूहाचे संस्थापक, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कारखाना कार्यस्थळी भेट देऊन अभिवादन केले.
या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प सा. रे. पाटील फौंडेशन व दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात आला. संचालक रणजित कदम यांच्याहस्ते स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील तसेच दिवंगत संस्थापक संचालकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५० रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर जांभळी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दामोदर सुतार, सर्जेराव शिंदे, अशोकराव निर्मळ, डॉ. कुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, रघुनाथ पाटील, रावसाहेब पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, यशोदा कोळी, महेंद्र बागे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दिलीप पाटील, जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने, अशोकराव कोळेकर, धनाजी पाटील-नरदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १११२२०२०-जेएवाय-०८
फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर स्व. सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.