शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

सदाभाऊंनी असं करायला नको होतं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 6:03 PM

Help Kolhapur- सदाभाऊ... साधा - सरळ,परखड असूनही जिंदादिल. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या माणसाने पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तमाम गारगोटीकरांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, सदाभाऊंनी असं करायला नको होतं..!

ठळक मुद्देसदाभाऊंनी असं करायला नको होतं...! भांदीगरे दाम्पत्याच्या आत्महत्येने गारगोटीकरांना धक्का

राम मगदूमगडहिंग्लज : सदाभाऊ... साधा - सरळ,परखड असूनही जिंदादिल. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या माणसाने पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तमाम गारगोटीकरांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, सदाभाऊंनी असं करायला नको होतं..!आकुर्डे (ता. भुदरगड) येथील सदाशिव बाळू भांदीगरे (वय ६२) व त्यांची पत्नी सुरेखा (वय ५७) या दोघांनी शुक्रवारी(५ मार्च) राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.वयोमानामुळे त्यांना मधुमेह - रक्तदाबाचा त्रास होता. परंतु, एवढ्या कारणासाठी त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे नातेवाईकांसह पंचक्रोशी सुन्न झाली आहे.गारगोटीच्या मौनी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ते लेखनिक होते.अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असल्यामुळे विश्वस्तांनी त्यांच्यावर ट्रस्टची जबाबदारी दिली होती. चार वर्षापूर्वी सेवानिवृत्तीच्यावेळी त्यांनी महाविद्यालयाला २५ हजाराची देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु काही अडचणीमुळे ते राहून गेले होते. त्याची हुरहूर त्यांना होती.इच्छा पुरी केली अन्..!आत्महत्येच्या आदल्या दिवशी गुरूवारी सदाभाऊंनी आपल्या महाविद्यालयात जाऊन सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची भेट घेतली. प्राचार्यांकडे देणगीचा धनादेश सुपूर्द करून आपली अपुरी इच्छा पूर्ण केली. त्यानंतर गावातील नातेवाईक- मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेतल्या‌. अन् दुसऱ्या दिवशी अर्धांगिनीसह जगाचा निरोप घेतला. भरल्या घरातूनदोघेही एकाच वेळी निघून गेल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.सामाजिक कामात नेहमीच पुढे..!गारगोटीचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. मोमीन यांचा अलिकडेच नागरी सत्कार झाला. त्याच्या नियोजनात ते पुढे होते. सेवानिवृत्तीनंतर जेष्ठ नागरिक संघ, हरिनाम सप्ताह यासह गावातील सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर