शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

सदर बझार, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी’ भारी

By admin | Published: November 03, 2015 12:38 AM

बारापैकी पाच ठिकाणी बाजी : काँग्रेस, भाजपला प्रत्येकी तीन जागा--ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय

कोल्हापूर : सदर बझार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी आघाडी’च भारी ठरली आहे. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या बारापैकी पाच प्रभागांत ताराराणी आघाडी, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी तीन प्रभागांत व राष्ट्रवादीला एका प्रभागात यश मिळाले. शिवसेना आणि अपक्षांना खातेही उघडता आले नाही.सदर बझार प्रभागात ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी १६९१ मतांसह बाजी मारली. विद्यमान नगरसेवक महेश जाधव यांच्याबाबतची नाराजी, डॉ. प्रवीण कोडोलीकर गटाचे पाठबळ आणि विकासाच्या मुद्द्यावरील प्रचार माने यांना फायदेशीर ठरला. महाडिक वसाहतीमध्ये पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराच्या संपर्काकडे पाहून मतदान झाले. यात माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या स्नुषा व ताराराणी आघाडीच्या उमेदवार सीमा कदम या १४०५ मतांनी विजयी झाल्या. राजर्षी शाहू मार्केट यार्ड प्रभागात काँग्रेसच्या सुरेखा शहा आणि ताराराणी आघाडीच्या वर्षा कुंभार यांच्यात लढत रंगली. यात शहा यांनी १५६९ मतांनी विजय मिळविला. विक्रमनगरमध्ये १२९५ मतांसह काँग्रेसच्या शोभा कवाळे यांनी यशाला गवसणी घातली. त्यांच्याविरोधात ताराराणी आघाडीच्या पल्लवी जाधव, शिवसेनेच्या चंद्रिका सागर यांनी चांगली लढत दिली. रुईकर कॉलनी प्रभागात भाजपच्या उमेदवार उमा इंगळे व नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पत्नी जयश्री यांच्यात चुरस रंगली. यात इंगळे यांनी १२४७ मतांनी बाजी मारली. साइक्स एक्स्टेंशन प्रभागात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक संजय मोहिते व भाजपचे कुलदीप देसाई यांच्यात लढत झाली. यात १३०६ मतांनी संजय मोहिते यांनी विजय मिळविला. देसाई यांना ११०० मते मिळाली. टाकाळा खण-माळी कॉलनी प्रभागात भाजपच्या सविता भालकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यात खरी लढत झाली. यात ५० मतांनी सविता भालकर विजयी झाल्या.(प्रतिनिधी)‘शाहूपुरी तालीम’वर पुन्हा नाईकनवरे व्यापारी पेठ असलेल्या शाहूपुरी तालीम प्रभागात गेल्या पाच वर्षांत नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचे वर्चस्व होते. यावेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रभागासाठी खुला झाल्याने नाईकनवरे यांनी स्नुषा पूजा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांची पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ यांची स्नुषा वैष्णवी यांच्याशी लढत झाली. यात पूजा यांनी २२६१ मते मिळवून विजय मिळविला.‘मुक्त सैनिक’मध्ये वाद नडलामुक्त सैनिक वसाहतीमध्ये माजी आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक एकनाथ काटकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. सतेज पाटील आणि डकरे गटाचे समर्थक पंकज काटकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली. यात एकनाथ काटकर यांना २५६ तर, पंकज काटकर यांना १६३६ मते मिळाली. या ठिकाणी ताराराणी आघाडीने राजसिंह शेळके यांना उमेदवारी दिली. शेळके हे १८३७ मतांनी विजयी झाले.