कोल्हापूर : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सदाशिवराव मंडलिक राष्टÑीय स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर अभिनेते सयाजी शिंदे, टेबल टेनिस प्रशिक्षक शैलजा साळोखे, तमाशा कलावंत राजश्री काळे, कृषी क्षेत्रासाठी गणपतराव पाटील, जीवन मुक्ती संघटनेच्या व्हाईट आर्मीचे उज्ज्वल नागेशकर यांना सदाशिवराव मंडलिक राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार देणार असल्याची घोषणा प्रा. संजय मंडलिक यांनी रविवारी केली.सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अॅग्री कल्चरल, एज्युकेशन अॅण्ड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनतर्फे हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. राष्टÑीय पुरस्कारासाठी १ लाख ५१ हजार रुपये व राज्य पुरस्कारासाठी ५0 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.गारगोटी (जि.कोल्हापूर) येथे बुधवारी (१४ नोव्हेंबर) या पुरस्कांराचे वितरण होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून परिवहन मंत्री दिवाकर रावते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शाहू महाराज, खासदार राजू शेट्टी, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत.
माशेलकर यांना सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:50 PM