शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

सुरक्षिततेचे उपायही तितकेच प्रभावी हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.कोल्हापूर शहराचा विचार करता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. ते रात्री बारानंतर कोल्हापुरात आले तर त्यांना जेवण, राहणे, प्रवासी वाहतुकीची सोय होत नाही. मात्र, शासनाच्या विधेयक मंजुरीने ही सुविधा मिळण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे या विधेयकाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.त्याचबरोबर रात्रभर ही आस्थापने, प्रतिष्ठाने, हॉटेल्स सुरू ठेवल्याने सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विशेषत: बार, मद्य, आदींच्या विक्रीसाठी निर्बंध हवेत, असा एकूणच सर्व स्तरांतून सूर उमटत आहे.कोल्हापुरातील आस्थापनाहॉटेल-लॉजिंग बोर्डिंग १२५रेस्टॉरंट ७५०मॉल्स ४यात्री निवास २००किराणा, धान्य दुकाने ७०००वैद्यकीय किरकोळ दुकाने ४५०शासनाने हे विधेयक आणून उत्तम निर्णय घेतला आहे. सध्या दळण-वळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यात कोल्हापूरच्या पर्यटनवाढीस या निर्णयामुळे हातभार लागणार आहे. यासह सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षिततेचे उपाय व पोलिसांनी नियमित गस्त ठेवल्यास हा उत्तम निर्णय ठरेल.- बाळ पाटणकर,हॉटेल व्यावसायिकनिर्णयाचा फायदा पर्यटनवाढीस होईल. त्याचबरोबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची आहे. लॉजिंगला २४ तास परवानगी नव्हती. मात्र, या निर्णयामुळे ती मिळेल.- सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हॉटेल मालक संघ,शासनाने या विधेयकास संपूर्ण मंजुरी दिल्यास शहरातील वर्दळही वाढेल. त्याचा फायदा रिक्षाचालकांच्या व्यवसायास हातभार लागण्यास होईल. रात्री साडेअकरानंतर शहरात बहुतांश रेस्टॉरंटमध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना जेवण मिळत नाही. या निर्णयामुळे पर्यटकांची वर्दळ वाढेल.- चंद्रकांत भोसले, रिक्षा व्यावसायिक, कोल्हापूरपर्यटनवाढीच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार करता, अंबाबाईचे मंदिर रात्री दहा वाजता बंद होते. त्यासह महिला कर्मचाºयांचाही प्रश्न मोठा आहे. रेल्वेगाड्यांचा राबताही मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही. सण, उत्सव काळातच हा निर्णय योग्य ठरू शकतो. - सीमा भोसले,हॉटेल व्यावसायिक,कोल्हापूर