जहांगीर शेखकागल : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलदांज झहीर खान आणि हिंन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवविवाहित दांपत्यांने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील ग्रामदैवत हजरत गैबी पीर आणि प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शन घेतले होते.सकाळी साडेनऊच्या सुमारास हे दांपत्य मोजक्या नातेवाईकांसह आले होते. त्यांच्या येण्याबद्दल गुप्तता राखण्यात आली होती. गैबी चौकात ते आले तेव्हा मात्र बघता-बघता गर्दी जमली. त्यांच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी, त्यांची सही घेण्यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरु होते. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. गैबी चौकाबरोबरच बॅरिस्टर खर्डेकर चौकातही प्रचंड गर्दी जमली होती.सागरिका घाटगे या कागलच्या घाटगे घराण्यातील विजयेन्द्र हिंदुराव घाटगे यांच्या कन्या आहेत. विजयेन्द्र हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मराठी, हिंन्दी चित्रपटात अनेक भुमिका केल्या आहेत. सध्या ते पुणे-मुंबईत राहतात. सागरिका हिने ' चक दे इंडिया ' या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे.झहीरसोबत विवाह केल्यानंतर हे दांपत्य घाटगे घराण्याचे मुळ गाव म्हणुन कागल येथील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. येथील प्रसिध्द गैबी पिरास त्यांनी गलेफ अर्पण केला. काकासाहेब वाडा येथुन गलेफ वाजत गाजत आणण्यात आला. यावेळी पंरपरेनुसार नगाराही वाजविण्यात आला.
त्यानंतर हे दांपत्य श्रीराम मंदिरात आले. येथे श्रीराम, सिता-माता, लक्ष्मण यांचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जोडीने आरतीही केली. या मंदिरातील विविध दैवतांचेही दर्शन त्यांनी घेतले. मंदिरातुन बाहेर पडतांना जहीर खानने अनेकांशी हस्तांदोलन केले.झहीर मराठी बोलतात... सागरिकास्थानिक पत्रकारांनी यावेळी झहीर खान याच्यांशी बोलण्याचा पर्यत्न केला. पत्रकार हिंदीत संवाद साधत असतांना सागरीका घाटगे म्हणाल्या की ते मराठी चांगले बोलतात. ते श्रीरामपुरचे आहेत. झहीर खाननेही मराठीत संवाद साधला.