शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

कचऱ्याच्या खतापासून बनविला आॅक्सिजन प्लांट संगीता पाडळकर : परिसर फुलला झाडांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:02 AM

आम्ही जगवली झाडे..!

शेखर धोंगडे ।   लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राहायला कचरा डेपोच्या समोरच. दररोजच कचऱ्याचे डोंगर पाहणे व दुर्गंधीच्या वासापासून सुटका करण्यासाठी स्वत:च्याच जागेत सुंदर फूलझाडे, फळझाडे लावून ३ वर्षांत दोनशेहून अधिक झाडे जगविली व ती आता फळे व फुले देऊ लागल्याचे संगीता तानाजी पाडळकर अभिमानाने सांगतात.पती तानाजी पाडळकर हे महापालिकेत विभागीय आरोग्य निरीक्षकपदी कार्यरत असल्याने २७ वर्षे त्यांचे वास्तव येथील ड्रेनेज प्लांट कॉलनीतच आहे. घरासमोर कचरा डेपो, प्रदूषणाचा त्रास यामुळे जगणे नकोसे झाले होते. त्यामुळे पती तानाजी यांच्याकडून व स्वत:ची आवड जपत कचऱ्यातून खत व बगीचा कसा फुलवायचा याची संगीता पाडळकर यांनी माहिती घेतली. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी अंगणात भव्य असा आॅक्सिजन प्लांट साकारला.आता ही सर्व झाडे दीड फुटापासून ते तीस फुटांपर्यंत सुंदररीत्या वाढली आहेत. संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून, वातावरण प्रसन्न व सुंगधी झाल्याचे संगीता पाडळकर सांगतात. कुंभार समाजाचा वारसा जपत सुबक-आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याची कलाही त्यांनी अवगत करीत, ५०० पेक्षा अधिक गणेशमूर्ती घडविल्या आहेत.कुटुंबात जसे आपण ‘हम दो हमारा एक’ या नियमानुसार वागतो, तसेच ‘हम दो हमारे पाच पेड’ असे वागल्यास पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषण थांबेल. फक्त संकल्प करून कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाडे जिद्दीने जगवा, तरच आपलेही जीवन झाडांप्रमाणेच फुलेल, बहरेल. सभोवतालचा परिसर प्रसन्न राहील.- संगीता पाडळकर, लाईन बाजार, कोल्हापूर.नवे जीवन, नवी आशादररोज जळता कचरा व त्यापासून होणारा आरोग्याचा त्रास आता या आॅक्सिजन प्लांटमुळे कमी झाला असून, या छोट्या दाट हिरवाईने पाडळकर यांच्या प्लॉटमध्ये नव्याने जगण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. तुम्हीही जगा व झाडांना जगवा, असा संगीता पाडळकर संदेश देतात.लावलेली झाडेनारळ, आंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, चिकू, केळी, पपई, पेरू, जांभूळ, सीताफळ, फणस, लिंबू, रामफळ अशा फळझाडांसह कडूलिंब-तुळस व विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, वेल तसेच विविध प्रकारच्या रंगांतील व वैविध्यपूर्ण जातीचे गुलाब, चाफा, सदाफुली, जास्वंदीची झाडे बहरली आहेत. जोडीला दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यामध्ये कांदा, भेंडी, मटकी, वांगी चवळी, दुधी भोपळा, दोडकाही उत्तमरीत्या पिकविल्याचे दिसते. सर्वसाधारण १२५ पेक्षा विविध जातींची झाडे येथे फुलली आहेत.