संतोष बामणे।उदगाव : सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती कोलमडली असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास भाजीपाल्याचा दर उतरल्याने काढून घेतला आहे. भाजीपाल्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शिरोळमधील शेतकऱ्यांना गेल्या अडीच महिन्यांपासून काडीमोल दराचे ग्रहण लागले आहे. भाजीपाला कोणी घेईना आणि कोण टोमॅटो विकत घेता का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे साहेब फक्त काढणी खर्च द्या आणि आमचा टोमॅटो न्या! अशी विनवणी शेतकरी करत आहेत.
शिरोळ तालुक्यातील उदगाव, नांदणी, दानोळी, कोथळी, उमळवाड, चिंचवाड, कवठेसार, हेरवाड, जांभळीसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते, तर गेल्या दहा वर्षांत दर्जेदार भाजीपाला पिकला नाही. पण यावर्षी विना औषधाचे पीके मोठ्या जोमात आली व उत्पादनही तीस ते चाळीस टक्के वाढले; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कर्नाटकातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे तालुक्यातील भाजीपाल्याचे दर पूर्णत: कोसळले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून कोबी व फ्लॉवर एक रुपयाला एक गड्डा, तर टोमॅटो प्रति किलो चार ते पाच रुपयांनी विक्री होत असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे भाजीपाला केलेला खर्चही न निघाल्याने शेतकºयांनी उभ्या कोबी व फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टर फिरवून सोन्यासारखी पिके खतासाठी वापरली आहेत. टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या, मेंढरे सोडून शेतकरी आर्थिक कचाट्यात आहे. शेतीला हमीभाव देणाºया सरकारने गांधारीची भूमिका घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.कृषिमंत्री कुठे आहेत?चळवळीतील कार्यकर्ते सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाजप सरकारकडून कृषिमंत्रीपद मिळाले. आमचा सदा मंत्री झाला, आता शेतकºयाला खरा न्याय मिळणार, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकºयांनी बाळगली होती. मात्र, मंत्री खोत यांनी स्वाभिमानीने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला आणि आपल्या पक्ष वाढीसाठी निवडणुकीच्या गप्पा मारणारे कृषिमंत्री सदाभाऊ खोत कुठे आहेत? अशी विचारणा शेतकºयांतून होत असून, शेतीमालाचं बोला अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.फसव्या सरकारने काय दिले!भाजीपाल्याला काडीमोल भाव असताना शेतकºयांना आमिषाचे गाजर दाखवून सत्तेवर बसलेल्या सरकारने शेतकºयांना भीक मागण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे शेतीच्या हमीभावासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यामुळे मी संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव व स्वामिनाथन आयोग लागू केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जीव हळहळतोय : जिवापाड भाजीपाला जतन करून दराअभावी फुकट टोमॅटो देण्याची वेळ आली आहे, तर बाजारपेठेत प्रति किलो टोमॅटो तीन ते चार रुपये दराने कोणी विकत घेतले तर खपतात. गेल्या पंधरा दिवसांपासून माल विक्री होत नसल्याने उभ्या पिकात मेंढरे सोडताना जीव हळहळतोय, असे उमळवाडचे शेतकरी सुभाष मगदूम यांनी सांगितले.सध्या भाजीपाला पिकास हवामान चांगले असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढली आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भाजीपाल्याला दर मिळत नाही. शासनाने भाजीपाला पिकासाठी स्थिर दर आकारला पाहिजे. शेतकºयांबरोबर ग्राहकालाही त्याचा फायदा होईल. भाजीपाल्याच्या जादा उत्पादनामुळे दर गडगडला असून, व्यापारी व दलाल यांचाच फायदा होत आहे.- इमाम जमादार, शेतकरी हेरवाड