आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 03 : कोतोली (ता.पन्हाळा) येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमीत्त पार पडलेल्या निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणेच्या साईनाथ रानवडेने शाहुपूरी तालीम कोल्हापूरच्या हसन पटेलवर प्रथम गुण घेत विजय मिळविला.
प्रथम क्रमांकाची कुस्ती ७५,००० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या निमित्त आयोजित मैदानात जवळपास १५० कुस्ता पार पडल्या यामध्ये दुसरया क्रमांकाच्या लढतीत शाहुपूरी तालमीच्या संतोष दोरवडने देवठाणेच्या संग्राम पाटीलवर घुटना डावावर मात केली.त्यास ६५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत सहयाद्री कुस्ती संकुल पुणेच्या अतिश मोरे यांने मोतीबाग तालमीच्या कपिल सनगरवर लपेट डावावर विजय मिळविला. तसेच तृतीय क्रमांकाच्या दुस-या लढतीत कोतोलीच्या कुमार शेलारने इचलकरंजीच्या संतोष सुद्रिकवर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळविला. या दोघांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
चौथ्या क्रमांकामध्ये कुस्ती पै सरदार सावंत छत्रपती शाहु आखाडा कोल्हापूर व पै निलेश तरंगे शाहुपूरी तालीम यांच्यात पार पडली.अतिशय अटीतटीची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. क्रमांक पाचची कुस्ती ही सुनिल शेळके शाहुपूरी विरुध्द उदयराज पाटील मोतीबाग यांच्या होऊन उदयराजने घुटना डावावर विजय मिळवित १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. याबरोबरच माळवाडीच्या भगतसिंग खोत, कोतोलीच्या स्वप्निल पाटील,भाचरवाडीच्या अमृत रेडेकर इ. मल्लांनी आपआपल्या मल्लावर प्रेक्षणीक विजय मिळविला.
या कुस्ती मैदानामध्ये आॅलिंपीयन पै बंडा पाटील रेठरेकर व कुस्तीमल्लविदया संस्थेचे संस्थापक श्री गणेश मनुगडे यांचा कोताली ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कुस्ती मैदानाचे नियोजन पै क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी केले. कुस्ती मैदानासाठी पै समिदर जाधव,नामदेव पाडेकर, कृष्णात फिरींगे, अरुण पाटील, सुरेश चौगुले, युवराज पाटील, सुनिल पाटील, रामभाऊ सावंत, लहु शेलार, रघुनाथ फिरींगे, श्रीकांत पाटील इ.पंच म्हणुन काम पाहिले. यशवंत पाटील दोनवडेकर व राजाराम चौगुले यांनी निवेदक म्हणुन काम पाहिले. बक्षिस वितरण प्रसंगी डी.जी.पाटील, सोपान पाटील, आंकुश शेलार, सज्जन पाटील, सरदार पाटील, आनंदा पाटील, सुरेश चौगुले आदी प्रमुख उपस्थिती होती.