शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

आर्थिक वादातून सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून, एका संशयितास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 11:46 AM

घराच्या दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून अभिषेकशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी चाकूने हल्ला चढवला.

निपाणी : चित्रपट गृहात काम करणाऱ्या युवकाचा चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना काल, रविवारी मध्यरात्री निपाणी येथील निराळे गल्ली येथे घडली. अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय-२१, रा. सैनिक टाकळी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आर्थिक वादातून तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला.या घटनेची माहिती अशी की, अभिषेक हा सैनिक टाकली येथील रहिवासी असून निपाणी येथील चित्रपट गृहात तो काम करतो.  तो आपल्या आईसह येथील निराळे गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तो चित्रपटगृहातील काम आटोपून आपल्या घरात प्रवेश करीत असताना दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून अभिषेकशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी चाकूने हल्ला चढवला. या हल्यात अभिषेक याचा मृत्यू झाला.याप्रकरणी एका संशयिताला शहर पोलिसांनी  ताब्यात घेतले असून अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  घटना घडल्यानंतर निपाणी पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.  ठाणे अंमलदार रमेश तळवार, हवालदार विनोद असोदे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांची जादा कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी