आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित पॉवर्ड बाय सनलाईफ इन्शुरन्स ‘सखी महोत्सव २०१७’ मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे झालेल्या महोत्सवाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सखींसाठी मेहंदी, समूह रांगोळी, पाककृती, फॅन्सी ड्रेस, एकल नृत्य, स्टँड अप कॉमेडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सतर्फे ‘स्वाभिमान’ या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.
सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सखी महोत्सवाचे उद्घाटन बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे सीनिअर एरिया ट्रेनिंग मॅनेजर परेश कुलकर्णी, टे्रनिंग मॅनेजर सतारी मगर, पायल नारायणी, ब्रॅँच मॅनेजर अमित महाजन, परीक्षक नीलिमा देशपांडे, माधवी शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. सखी महोत्सवाची सुरुवात समूह रांगोळी स्पर्धेने झाली. दोघी-तिघींच्या समूहाने निसर्गचित्र, गणपती, पारंपरिक ठिपक्यांची रांगोळी रेखाटली. मेहंदी स्पर्धेत विविध आकर्षक डिझाइन्स हातावर रेखाटून सखींनी उत्साही सहभाग नोंदविला.
पाककृती स्पर्धेमध्ये कैरी व आंब्यांपासून सखींनी गोड किंवा तिखट पदार्थ केले होते. ते अतिशय कलात्मकतेने सजविले होते. स्टॅँड अप कॉमेडी स्पर्धेमध्ये किस्से, विनोद सांगून, नकला करून स्पर्धकांनी सखींना हसविले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत बंगाली, मेघालय या प्रदेशांतील वेशभूषा, कठपुतळी, लावणीसम्राज्ञी, बार्बी गर्ल, अशा व्यक्तिरेखा साकारून सखींनी आत्मविश्वासाने रॅम्पवर पावले टाकली. एकल नृत्य स्पर्धेत लावणी, वेस्टर्न, रिमिक्स अशी नृत्ये सादर करून उपस्थितांना ताल धरायला लावला. नीलिमा देशपांडे, माधवी शहा यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमात प्रल्हाद-विक्रम प्रस्तुत आॅर्केस्ट्रा, हिटस् बीटस्तर्फे बहारदार गाणी सादर करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सतर्फे ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल, कुटुंबाला हातभार लावून स्वावलंबनाचे धडे कसे गिरविता येतील, हे सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची प्रेरणा दिली. याप्रसंगी विशेष लकी ड्रॉ, प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून सखींना बक्षिसे जिंकण्याची संधी बिर्ला सनलाईफच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाईफतर्फे महिलांना प्रेरणा देण्याकरिता या ठिकाणी विशेष चित्रफीत दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना सशक्तीकरणाचे धडे देत एक उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रल्हाद पाटील यांनी आपल्या खास शैलीत निवेदन करून सखींना खिळवून ठेवले.
स्पर्धांचा निकाल
समूह रांगोळी :
श्रद्धा पेंडुरकर, शैलजा गिरिगोसावी, राजेश्वरी मोटे (प्रथम); मनीषा पोवार, शुभांगी पोवार (द्वितीय); नलिनी पिळणकर, अनिता गडकरी (तृतीय); वर्षा माने, पुष्पा गुदगे, जयश्री घस्ते, सुषमा हिरवे, शुभांगी कांबळे (उत्तेजनार्थ).
मेहंदी :
सुम्मय्या मंगळूरकर (प्रथम), सारा मुल्ला (द्वितीय), अनिता गडकरी (तृतीय).
पाककला :
शैलजा गिरिगोसावी (प्रथम), विमल चौगले (द्वितीय), प्राजक्ता उगारे (तृतीय), सारिका उपाध्ये, श्रद्धा पेंडुरकर (उत्तेजनार्थ).
स्टॅँड अप कॉमेडी :
शुभांगी साखरे (प्रथम), वनिता बक्षी (द्वितीय), छाया चिंचवाडे (तृतीय).
फॅन्सी ड्रेस :
छाया चिंचवाडे (प्रथम), ज्योती कुमठेकर (द्वितीय), अंजली ढोकर (तृतीय), अमरजा नाझरे, शुभांगी साखरे (उत्तेजनार्थ).
एकल नृत्य :
मनाली हंकारे (प्रथम), मयूरी जाधव (द्वितीय), प्रियांका जगताप (तृतीय), विद्या उंडाळे, आसावरी माने (उत्तेजनार्थ).