कोल्हापूर : ‘लोकमत सखी मंच’ आणि व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आणि रविवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिरातून कोल्हापुरातील सखी मंच सदस्यांना ‘डान्स अँड फिटनेस’चा मंत्र मिळाला. या सदस्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले.
येथील राजारामपुरी नववी गल्लीतील आरबीएल बँकेजवळील व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंटमध्ये हे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यात फिटनेसमधील मसल्स स्ट्रेंथ, फेक्झिबिलिटी, वेटलॉस आणि डान्समधील फ्री-स्टाईल, जॅज, सोलो आणि ग्रुप या प्रकारात प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी अकरा ते दुपारी बारा, दुपारी बारा ते एक, दुपारी चार ते सायंकाळी पाच आणि सायंकाळी पाच ते सहा अशा चार बॅचेसमध्ये शिबिर झाले. त्यामध्ये प्रशिक्षक ओंकार शेटे, आरती जनगौडा, सिध्दार्थ साळोखे, मयुरी सोनार, प्रणव पोतदार, सचिन सावंत यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाबाबतच्या शासन नियमांचे पालन करून हे शिबिर घेण्यात आले. शहरातील विविध परिसरातील सखी मंच सदस्या या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. आरोग्याच्यादृष्टीने सुदृढ राहण्यासाठी डान्स उपयुक्त ठरतो. त्यामुळे डान्सबरोबरच फिटनेसचा मंत्र हा तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मिळाल्याने या सदस्यांमध्ये समाधान, आनंदाचे वातावरण होते.
फोटो (१६०२२०२१-कोल-फिटनेस शिबिर) : कोल्हापुरात रविवारी ‘लोकमत सखी मंच’ आणि व्ही ॲन्ड एन एंटरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने ‘डान्स अँड फिटनेस’ प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्यात सखी मंच सदस्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.
(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)