शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्लास्टिक बंदीचा कायदा, कोल्हापुरात वसुलीची नवा धंदा

By भारत चव्हाण | Published: December 12, 2023 3:36 PM

महापालिकेच्या ५ कर्मचाऱ्यांना पगारापेक्षा जास्त मिळते दक्षिणा 

भारत चव्हाण कोल्हापूर : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू असताना कोल्हापूर शहरात बंदी असलेले प्लास्टिक येते कोठून, हा प्रश्न अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना कधी पडला नाही. अगदीच काही विचारणा झाली, टीका झाली तर तोंडदेखले कारवाई करायची आणि काही दिवसांनी पुन्हा डोळेझाक करायची, हा शिरस्ताच होऊन गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच कर्मचारीच प्लास्टिक बंदीच्या विरोधात असल्याने त्यांच्या कृपेने शहरात प्लास्टिक उत्पादन, साठवणूक आणि विक्री सुरू आहे. या कृपेची भरपाई प्रत्येक महिन्याला न चुकता व्यापारी, विक्रेते इमानेइतबारे करतात.एखादा कायदा अधिकाऱ्यांची वरकमाई करणारा, त्यांना महिन्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारा कसा असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे प्लास्टिक बंदीचा कायदा आहे. २०१७ साली कायदा अस्तित्त्वात आला आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकवर बंद आली. नवीन कायदा असल्याने आणि तत्कालिन सरकारच्या दबावापोटी पुढची दोन वर्षे कडक अंमलबजावणी झाली.महानगरपालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कडक भूमिका घेत अनेकांना दंडात्मक कारवाईचे धक्के दिले. अगदी ज्यांनी कार्यक्रमाला बोलावले, त्यांनाही दंड केले. त्यामुळे दंड आणि कारवाईच्या भीतीने बंदी असलेले प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, विक्री बंद झाली. पण, आता अंमलबजावणीकडे सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या अकरा महिन्यात एकच कारवाई केली. यावरूनच कायद्याच्या अंमलबजावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.पाच कर्मचाऱ्यांचे विक्रीला अभयआरोग्य विभागातील पाच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कृपेने शहरात प्लास्टिक विक्री राजरोसपणे सुरू आहे. कोणत्याही दुकानात गेलात, फळविक्री, भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे गेलात तर तुम्हाला सहजपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होतात. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अनेक फळ विक्रेते आहेत. त्यांच्या प्रत्येक गाडीवर तुम्हाला प्लास्टिक पिशव्या मिळतात. पण, कार्यालयात असलेल्या एकाही आरोग्य निरीक्षकास या पिशव्या दिसून येत नाहीत.२४ विक्रेते अन् २.४०ची दक्षिणाशहर परिसरात २४ उत्पादक, विक्रेते बंदी असलेल्या प्लास्टिकच्या विक्री व्यवसायात आहेत. त्यातील सात ते आठ गांधीनगरात आहेत. या २४ उत्पादक, विक्रेत्यांकडून प्रत्येकी १० हजाराची दक्षिणा प्रत्येक महिन्याच्या चार किंवा पाच तारखेला ठेवली जाते. २ लाख ४० हजार इतकी दक्षिणा हातात पडते, पुढे ती आपापसात वाटून घेतली जाते. महापालिकेचा पगार जेवढा मिळत नाही, त्यापेक्षा कितीतरी रक्कम त्यांच्या हातात पडत आहे.

कारवाईतही चपलाखी..कारवाई करण्याचा प्रसंग आला तर पहिल्या कारवाईची पावती मालकाच्या नावावर केली जाते. नंतर तोच दुकानदार पुन्हा पुन्हा सापडला तर नंतरच्या सर्व पावत्या कर्मचाऱ्यांच्या नावावर करून मालकांना मोठ्या शिक्षेपासून अभय दिले जाते. कारवाई करायला जायचे असल्यास आधीच तसे निरोप संबंधितांपर्यंत पोहचवून आपण काही तरी करीत असल्याचा आभास याच कर्मचाऱ्यांकडून केला जातो.उत्पादकांचा असाही दबावएक उत्पादक तर भलताच चतुर आहे. कोणी एखाद्याने त्याच्या दुकानात माल खरेदी न करता अन्य दुकानदाराकडून खरेदी केला तर लगेच तो संबंधित आरोग्य निरीक्षकांना माहिती देऊन प्लास्टिक पिशव्या विक्रीबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlastic banप्लॅस्टिक बंदी