कोल्हापूर : रिअल ग्रुपने अत्याधुनिक शुद्ध ऑक्सिजन पुरवणारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोल्हापूरमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहकांसाठी फक्त आज शुक्रवारी व उद्या कंपनीने खरेदीवर भरघोस डिस्काउंट जाहीर केला आहे. मोफत प्रात्यक्षिक व विक्रीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मशिनची किंमत ३८ हजार ५०० असून ग्राहकांना खास सवलतीच्या दरात फक्त रु.२८ हजार ४९० रुपयांना मिळणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन वापरण्यास अत्यंत सोपा आहे. हे अत्यंत दर्जेदार प्रॉडक्ट असून टिकाऊ आणि किफायतशीर आहे. याला कोणताही मेंटेनन्स नसून दीर्घकाळ वापरण्यास अत्यंत उपयुक्त आहे. एक वर्षाची वॉरंटी व ३ वर्षे मोफत सर्व्हिस फक्त रिअल ग्रुपकडूनच मिळणार आहे. रुग्णांना ऑक्सिजनच्या गरजेनुसार प्रतिमिनिट १ लिटर ते ७ लिटरपर्यंतच्या क्षमतेत जनरेटर उपलब्ध आहेत. रिअल ग्रुपचे राजकुमार बावसकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्याही आजारने गंभीर झालेल्या रुग्णांसाठी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आधार ठरला आहे. हवेतील ऑक्सिजन या मशिनद्वारे शोषला जातो आणि ९३ टक्क्यापर्यंत शुद्ध ऑक्सिजन रुग्णाला मिळतो, हे याचे खास वैशिष्ट्य आहे. हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे रुग्ण बरा झाल्यानंतरसुद्धा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
फोटो : १७०६२०२१-कोल-ऑक्सिजन न्यूज