कोल्हापूर : गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात मोदकाला नारळ, पुजनाला नारळ, नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अशा नारळाच्या महत्वामुळे कोल्हापूरकरांना केवळ गणेशोत्सवाच्या काळात दररोज सव्वा लाखाहून अधिक नारळ लागत आहेत. यासह अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल कोट्यावधींच्या घरात पोहचली आहे.दररोजच्या जेवणात नारळाचा वापर करणाºया मंडळांनी तर नारळ खोबºयाचा वापर केल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही. यात दोन दिवसांतून एक ट्रक नारळांची तामिळनाडूवरुन आवक होती. या ट्रकमध्ये २६ हजार नारळ भरतात. यावरुन रोजच्या खपाचा अंदाज येईल . पण गणेशोत्सवाचा काळ गृहीत धरता दिवसाला किमान पाच ट्रक नारळांची आवक तामिळनाडू, कर्नाटकातून होत आहे. त्यानूसार १ लाख २५ हजाराहून अधिक नारळांची विक्री दिवसाकाठी होत आहे.यासह गणरायाची आरास करण्यासाठी विविध सुगंधी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फुलांचे किलोचे भाव पुढीलप्रमाणे, गलाटा (१५० रु) , गुलाब ( १० रु प्रतिनग), झंड (३००रु किलो )अॅस्टर (४नगांची एक पेंडी १० रु), , केवडा (७० रुपये प्रतीनग), कमळ (१० ते १५ रुपये प्रतीनग),असा आहे. या फुलांचे दरही पावस नसल्याने वाढले आहेत. फुल बाजारातील गणेशोत्सव काळातील उलाढालाही लाखो रुपयांच्या घरात पोहचली आहे.गणेश भक्तांचा उत्साह वाढण्यासाठी वातावरण सुगंधीत राहणे गरजेचे असते. त्यामुळे सुगंधी वातावरणासाठी हरतºहेच्या अगरबत्तीही बाजारात आल्या आहेत. त्याचा सुगंधी धुर कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत पोहचला आहे. विशेषत: एक रुपयांपासून अगदी ५०० रुपयांपर्यंत अगरबत्तीच्या किंमती आहेत.
गुजरात, कर्नाटक आदी राज्यातून अगरबत्ती कोल्हापूरातील स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. गणेशोत्सवाचा काळ ११ दिवसांचा असतो त्यामुळे या कालावधीत मोठ्या अगरबत्तीनाही मागणी आहे. याकरीता ९ व १५ दिवस जळणारी अगरबत्ती बाजारात आली आहे. त्यांच्या किंमतीही अनुक्रमे अडीच हजार, ३०० रुपये आहेत.यासह कापूरही मोठ्या प्रमाणात लागतो. यात छोटा, मोठा, षटकोनी, चौकोनी असे १० ग्रॅम पासून किलोच्या पॅकींगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. किंमतही अगदी रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत किमंत आहे. यासह केवळ होम हवनसाठी ‘भीमसेन ’काळा कापूरही बाजारात विक्री उपलब्ध आहे. विशेषही या कापूराचा वापर स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी रुमालामध्ये एक तुकडा ठेवला जातो. त्यामुळे या कापूरालाही मागणी वाढली आहे. याचा दरही १० ग्रॅमला ३५ रुपयांना आहे.कापूसाचे वस्त्रालाही मोठी मागणी आहे. हे वस्त्र १० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. यंदा गणेशमूर्तीच्या फुटांप्रमाणे तयार वस्त्रमाळ बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. अगदी १ फुटांपासून २१ फुटांपर्यंतच्या या माळा उपलब्ध आहेत. यासह अष्टगंधामध्ये सुगंधी व नियमित असे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नियमित अष्टगंध २०० रु किलो आहे. बाप्पाला फळांचा नैवेधही लागतोच त्यामुळे फळबाजारही तेजीत आहे. पाच फळे अगदी ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात सफरचंद, डाळींब, सिताफळ, संत्री, चिक्कु, यांचा समावेश आहे.
मोदकासाठी हवा कर्नाटकी नारळ
गणरायाला २१ मोदकांचा नैवेधाशिवाय गणेशोत्सव होत नाही. या मोदकाला खास कर्नाटकी नारळाच्या खोबºयाचा किस लागतो. हे खोबºयाला जाडी अधिक असते. त्याचा दरही नियमित नारळापेक्षा अधिक आहे. शेकडा १८०० ते २५०० असा घाऊक बाजारात दर आहे. तर तोरणासाठी व गणरायाला वाहनासाठी तामिळनाडूतील शेंडी नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा दरही शेकडा १०५० रुपये इतका घाऊक बाजारात आहे.तामिळनाडू, कर्नाटकात गेल्यावर्षीपासून पावसाने ओढ दिल्याने नारळाचे दर गेल्या वर्षीच्या मानाने यंदा वाढलेले आहेत. रोज कोल्हापूरात किमान ३-४ ट्रक नारळांची आवक होते. एका ट्रकमध्ये जास्तीत जास्त २६ हजार नारळ भरतात. नारळाच्या भरतीवरुन किंमतही ठरते.बिपीन बेंडके,नारळ व्यापारी,नियमित अगरबत्ती, कापूरासह १५ व ९ दिवस सलग जळत सुगंध पसरवणारी अगरबत्ती बाजारात आली आहे. यासह भिमसेन कापूरालाही मोठी मागणी आहे. जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या काळात अगरबत्ती व कापूर यांची कोट्यावधीची उलाढाल होते.- राहूल हळदे,अगरबत्ती, कापूर विक्रेते,