एकनाथ पाटील
कोल्हापूर - यादवनगर येथील मटका अड्डयावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पिस्तूल घेऊन पसार झालेला मटका चालक सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांनी सरकारी पिस्तूल ताब्यात घेतले आहे. सलीम यासिन मुल्लासह त्याच्या भावांना बुधवारी (10 एप्रिल) दूपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अवैध व्यावसायिकाकडून पोलिसांना मारहाण करून त्यांचेच पिस्तूल काढून पसार झाल्याची कोल्हापूरमधील ही पहिलीच घटना आहे. नेहमी काही पोलिसांसोबत उठबस असणारा गुन्हेगार सलीम मुल्लाची मग्रुरी वाढली त्याला पोलीस कारणीभूत आहेत. काही महिन्यांनी पुन्हा कारागृहातून बाहेर आल्यानंतर हाच सलीम पोलिसांना हाताशी धरून पुन्हा मटका सुरू करणार असल्याचं परिसरातील नागरिक म्हणत आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगाराला मोका लावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.