वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी महाराष्ट्रातील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने शरद पवार यांची ‘यूपीए’च्या अध्यक्षपदाची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. पास, अपंगांना पेन्शन पत्र, विधवा महिलांना पेन्शन पत्र, ज्येष्ठ कलाकारांना पेन्शन पत्र वाटप, तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉ. संगीता गुरव (वैद्यकीय अधिकारी, वडणगे आरोग्य उपकेंद्र) यांचा सत्कार ए. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.
यावेळी सुनील बी. पाटील, सुनील परीट, वैद्यराज पाटील, विश्वजित पाटील, सनी पन्हाळकर, मधुकर जांभळे, संभाजी पाटील, शिवाजी देसाई, प्रभाकर काशीद, शारदा घोडके, गीता पाटील उपस्थित होते.
फोटो ११ वडणगे सत्कार
ओळी : वडणगे (ता. करवीर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए. वाय. पाटील, सुनील बी. पाटील, सुनील परीट, मधुकर जांभळे उपस्थित होते.