कागल : कागल शहरातील जुने तहसीलदार कार्यालय तसेच त्यास लागून असलेली जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची व नगरपालिकेच्या शाहू हॉलची मिळून सुमारे अडीच एकर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असताना कागलच्या घाटगे संस्थानिक घराण्यातील सदस्य प्रवीणसिंह घाटगे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी आपल्या नावावर बेकायदेशीररीत्या करून घेतली असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथील एका जाहीर सभेत केला. समरजीत घाटगे यांनी ही जागा पूर्वरत नगरपालिकेला द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्यथा आम्हाला अन्यथा मोठी जनआंदोलन उभे राहील. असा इशाराही त्यांनी दिला.येथील शाहू मेमोरियल हॉल नव्याने बांधण्यात बांधण्यात येणार असून त्याच्या बांधकाम शुभारंभाबद्दल आयोजित कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. त्यापूर्वी भाषणात जिल्हा बँकेचे संचालक भय्यासाहेब माने व माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी या जागेवरून समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केले. शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन संस्थानिकांनी ही जागा शासनाला दिली होती. वास्तविक देशात त्यानंतर अशा जागा कोणत्याच संस्थानिकांनी काढून घेतलेल्या नाहीत. मात्र घाटगे यांनी चुकीची कागदपत्रे आणि व्यवहार करीत काही लोकांना हाताशी धरून या जागा आपल्या नावावर केलेल्या आहेत. ही कागलच्या जनतेची फार मोठी फसवणूक आहे. कारण नगरपालिकेचे आरक्षण या जागेवर असून शाहू हॉल नगरपालिकेच्या मालकीचा आहे तर पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषदेचा मालकीचा आहे. मग ही जागा त्यांच्या नावावर कशी झाली याची आम्ही चौकशी करू आणि आंदोलनही छेडू असा इशाराही दिला आहे. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, चंद्रकांत गवळी तात्यासाहेब पाटील, प्रकाश नाळे, अजित कांबळे, संजय चितारी, असलम मुजावर, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.
Kolhapur: समरजीत यांच्याकडून बेकायदा जमीन नावावर, मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप; आंदोलनाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:09 IST