रक्तदान शिबिराचे उद्घाटन शाहू कारखान्याचे संचालक बॉबी माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहू दूध संघाचे संचालक युवराज पसारे, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, आप्पासाहेब हुच्चे, राजेंद्र जाधव, विशाल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाटील, युवराज पसारे, मनोज गाडेकर आदींनी केले. प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्यावतीने हे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी श्यामराव पाटील, हरी पाटील, विष्णू साऊळ, मेजर वरक, हरी राणे यांच्यासह काळम्मावाडी वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. आभार संदीप शिंदे यांनी मानले.
............
घाटगे यांनी वाढदिवस साजरा केला नाही.
कोरोनाच्या माहामारीने केलेला कहर आणि आपले चुलत चुलते विजयसिंह घाटगे यांचे झालेले निधन यामुळे आपण यावेळी वाढदिवस साजरा करणार नाही, असे समरजित घाटगे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत, तसेच दरवर्षी आयोजित उपक्रमही घेतले नाहीत, तरीही स्थानिक पातळीवर स्पर्धा, मेराथाॅन, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप असे उपक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केले आहेत.
फोटो कॅपशन
काळम्मावाडी वसाहतीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरासाठी आलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या डाॅक्टरांचा सत्कार धरणग्रस्तांच्यावतीने करण्यात आला.