शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

समरजितसिंह घाटगेच भाजपचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी कागल तालुक्यातून भरपूर इच्छुक आहेत; पण त्यामुळे समरजितसिंह घाटगे समर्थकांनी विचलित व्हायचे कारण नाही. कारण या तालुक्यात सर्वांत पहिल्यांदा तुम्ही भाजपचा झेडा खांद्यावर घेतला आहात. त्यामुळे पहिल्या रांगेत समरजितसिंहच असतील, बाकीचे नंतर असतील, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी केले.कागल ...

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी कागल तालुक्यातून भरपूर इच्छुक आहेत; पण त्यामुळे समरजितसिंह घाटगे समर्थकांनी विचलित व्हायचे कारण नाही. कारण या तालुक्यात सर्वांत पहिल्यांदा तुम्ही भाजपचा झेडा खांद्यावर घेतला आहात. त्यामुळे पहिल्या रांगेत समरजितसिंहच असतील, बाकीचे नंतर असतील, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी केले.कागल तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक आणि पदाधिकारी नियुक्तीची पत्रे वितरण कार्यक्रमात आ. हाळवणकर मंगळवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबा देसाई होते. समरजितसिंह घाटगे यांच्या झंझावाताने इथल्या राजकीय मंडळींची झोप उडाली आहे. म्हणून ते ‘मैदान सोडून जाऊ नका’ अशी भाषा करीत आहेत, अशी टीकाही आ. हसन मुश्रीफांचे नाव न घेता त्यांनी केली. कागलच्या गटा-तटाच्या राजकारणात आम्हाला स्थान मिळेल काय? याची चिंता होती; पण आज भाजपचे काम दखल घ्यावे असे आहे. मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. आता तालुक्याला हक्काचा कमळ चिन्हाचा ब्रॅण्डेड आमदार मिळेल, असेही ते म्हणाले.समरजितसिंह घाटगे म्हणाले की, २०१९ ची निवडणूक ही केवळ भाजप आणि समरजितसिंह घाटगेंची नाही, तर ती कागल तालुक्याच्या आत्मसन्मानाची आहे. आमची दिशा योग्य असल्यानेच आमच्यावर टीका होत आहे. यावेळी करणसिंह घाटगे, कर्णसिंह रणनवरे यांनी ठरावांचे वाचन केले. यावेळी तालुकाध्यक्ष परशुराम तावरे, प्रचारक शिवाजी बुवा, विशाल पाटील मळगेकर, आदी उपस्थित होते.समरजितसिंहच आमदार...ज्येष्ठ नेते बाबा देसाई म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांना आमदार करण्याचे आपले सर्वांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा. हे सांगण्यासाठी आज मुद्दाम आ. हाळवणकर येथे आले होते. तर परशुराम तावरे म्हणाले की, समरजितसिंह घाटगे हे गरुडाचे पिल्लू आहे. मैदानातून पळ काढणार नाही, तर तुम्हाला कधी उचलून नेले हे कळणार नाही.स्वर्गीय राजेंच्या स्वप्नपूर्तीसाठीच मैदानातसमरजितसिंह घाटगे म्हणाले की, राजेंनी मला सांगितले होते की, तुम्हाला राजर्षी शाहूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व माझ्या स्वप्नातील कागल घडविण्यासाठी कठोर श्रम करावे लागतील. खूप पचवावे लागेल. नीळकंठ व्हावे लागेल. सगळेच तुमच्या अंगावर येतील. तयारी असेल तर शब्द द्या. मी त्यांना शब्द दिला आहे, म्हणून मैदानात उतरलो आहे.