शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

समता संघर्ष समितीची निदर्शने

By admin | Published: June 21, 2016 1:02 AM

इचलकरंजी प्रांतांकडे मागणी : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खुनाचा तपास गतीने करावा

इचलकरंजी : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. एम. एस. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास अधिक गतीने होऊन दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन येथील समता संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.निवेदनात, दाभोलकर यांच्या खुनाचा ३४ महिने, पानसरे यांच्या खुनाला १६ महिने, तर कलबुर्गी यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ कालावधी लोटला असूनही खुनाचा तपास पूर्ण होऊ शकला नाही. याबाबत महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. पानसरे यांच्या खुनासंदर्भात सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक झाली. मात्र, तपास पुढे मंदावल्याचे दिसते. तर आता दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी साधक वीरेंद्र तावडे याला अटक केली आहे. तसेच सनातनचे दोन साधक सहभागी असल्याचे सीबीआयचे मत आहे. एवढे होऊनही सनातनचे प्रवक्ते व वकील दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे सनातन संस्थेच्या सर्व कार्यालयांवर छापे टाकून तेथे काय चालते, याचा तपास करावा. फरार झालेल्या साधकांना शोधून काढून त्यांची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये लावावीत, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुनील स्वामी, शारदा चव्हाण, विनायक चव्हाण, माधव कुलकर्णी, बजरंग लोणारी, दत्ता माने, प्रसाद कुलकर्णी, साहेबलाल मुल्ला, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)