कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन केले. सत्यशोधक पद्धतीने राज्याभिषेक विधी करण्यात येऊन जलपूजन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पोवाडा सादर करण्यात आला. सत्यशोधक पद्धतीने सर्व राज्याभिषेकाचे विधी शाक्तपुरोहित रामदास पाटील यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नेत्रदीप सरनोबत म्हणाले, पुढील वर्षी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पापाची तिकटी येथे उभारून राज्याभिषेक सोहळा केला जाईल, यासाठी प्रयत्न करू.मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संभाजी महाराजांच्या जीवनावरील चरित्राचे वाटप (शंभू जागर) करण्यात आले. संभाजी ब्रिगेड कामगार संघटना युनियन, रसिका मोटर्स यांच्यातर्फे दूध वाटप करण्यात आलेसंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. संभाजी साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. अश्विन वागळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता (महावितरण) अंकुर कावळे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, नेत्रदीप सरनोबत, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत गाजरे, शाहीर दिलीप सावंत, शाहीर रंगराव पाटील, शिल्पकार शैलेंद्र डोंगरसाने, सतीश घारगे, लेखक सुजय देसाई, नगरसेवक ईश्वर परमार, प्रा. मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संयोजन संयोजक विकी जाधव, अभिजित कांजर, भगवान कोईगडे, योगेश जगदाळे, रणजित देवणे, प्रमोद पाटील, सागर शिंदे, रमेश यादव, निकिता माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.