शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

संभाजीराजे नाशिक लोकसभेच्या रिंगणात शक्य, स्वराज्य पक्षाची संघटनात्मक बांधणी

By विश्वास पाटील | Published: February 14, 2023 1:28 PM

महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिल्यास तगडे आव्हान

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे हे नाशिक लोकसभा मतदार संघातून येणारी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी सुरू केली आहे. त्यांनी ११ फेब्रुवारीला वाढदिवस यावर्षी नाशिकलाच साजरा केला आहे. आगामी २०२४ ला स्वराज्य पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आपली ताकद दाखवेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.नाशिकला मागच्या दोन निवडणुकीत शिवसेनेकडून हेमंत गोडसे लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यांच्याशीही संभाजीराजे यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यांची सध्याची राजकीय लाइन भाजपशी मिळती जुळती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना अजूनही भाजपचा पडद्याआडचा हात सोडायचा नाही, असे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना मोठे बळ आहे. सध्याच्या घडामोडीही त्यांच्या सूचनेनुसारच सुरू असल्याचे सांगण्यात येते. स्वराज्य पक्षाच्या गावोगावी शाखा स्थापन करण्याचा त्यांचा धडाका लावला असून, दोनशेहून अधिक शाखा सुरू झाल्या आहेत.महाविकास आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे. मागील दोन निवडणुकीत छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव झाला आहे. या जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा पारंपरिक मतदार आहे. आता प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबत आहेत. त्यांच्या ‘वंचित’च्या उमेदवारास गेल्या निवडणुकीत तिथे एक लाखावर मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिल्यास तगडे आव्हान उभे राहू शकते.तसे पाहता कोल्हापुरातही संभाजीराजे यांना चांगली स्पेस आहे. कोल्हापूरच्या जनतेचे छत्रपती घराण्याशी भावनिक नाते आहे. त्यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा, मराठा समाजासाठी झगडणारा नेता येथेही हवा निर्माण करू शकतो. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडे निवडणुका एक वर्षावर आल्या असतानाही ताकदीचा उमेदवार नाही. त्यांनी यापूर्वी २००९ला पहिल्याच लढतीत मोठे आव्हान निर्माण केले. 

लोकसभेच्या २०१९चा निकालहेमंत गोडसे (शिवसेना) - ५, ६३,५९९समीर भुजबळ (राष्ट्रवादी) - २,७१,३९५माणिकराव कोकाटे (अपक्ष) - १,३४,५२७पवन पवार (वंचित आघाडी) - १,०९,९८१.दृष्टिक्षेपात निकाल२००४-२००९ : राष्ट्रवादी काँग्रेस२०१४-२०१९ : शिवसेना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती