Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:08 AM2022-05-04T11:08:40+5:302022-05-04T11:43:32+5:30

थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना खासदार केले. परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत.

Sambhaji Raje journey with the ideology of Congress? It is likely that he will contest from a Lok Sabha constituency in Marathwada | Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत?

Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत?

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत आज मंगळवारी संपली. मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असली तरी त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच म्हणजेच काँग्रेससोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह आहे. त्यांचीही पाऊले त्याच दिशेने पडत आहेत.

संभाजीराजे यांची ११ जून २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी खासदार म्हणून नियुक्ती केली. परंतु मूळ ही जागा ३ मे २०१६ ला रिक्त झाल्याने संभाजीराजे यांची मुदतही ३ मे २०२२ ला संपली. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना खासदार केले.

परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. उत्तर प्रदेशच्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार करावा असाही प्रयत्न झाला. परंतु ते तेव्हाही व त्यानंतरही भाजपला मते द्या असे सांगायला कुठेच गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या खासदारकीला भाजपकडून मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्टच होते.

गेल्या आठवड्यात कोल्हापुरात झालेल्या एका पुस्तक प्रकाशनात शाहू छत्रपती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत माजी आमदार मालोजीराजे हे प्रचारात सक्रिय होते. काँग्रेसचा विजय होण्यात त्यांचा वाटा आहे. कोल्हापूर शहराच्या राजकारणात ते काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजे वेगळ्या वाटेने जातील असे दिसत नाही. मुळातच शाहू छत्रपती यांचा काँग्रेसच्या विचारधारेने जाण्याचा आग्रह होता व आहे. त्यामुळे संभाजीराजे त्याच वाटेने पुढे जातील असे आजचे चित्र आहे.

मराठवाड्याचा पर्याय

खासदारकीची मुदत संपल्यावर मंगळवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण महाराष्ट्र व दिल्लीतही काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील एखाद्या लोकसभा मतदार संघातून ते काँग्रेसकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर व त्या अगोदरही मराठवाड्याच्या भूमीत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना त्या प्रदेशात मोठे पाठबळ आहे. स्वत: वेगळा पक्ष काढण्याची शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही छत्रपती घराण्याचे चांगले संबंध आहेत.

Web Title: Sambhaji Raje journey with the ideology of Congress? It is likely that he will contest from a Lok Sabha constituency in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.