प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : भाजपने मिशन कºहाड उत्तर विधानसभा मागेच सुरू केलेय. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी या मतदार संघाचे पालकत्व स्वीकारल्यावेळीच याचे संकेत मिळाले होते; पण कºहाड उत्तरचा भाजपचा नेमका उमेदवार कोण? हे सांगण्याचं ‘धैर्य’ कोणच करीत नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांच्यात उमेदवारीबाबत असणारा ‘घोर’ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपवला.दोन दिवसांपूर्वी कºहाडात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मनोज घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कार्यकर्त्यांना जणू ‘आता कामाला लागा’ असा संदेशच त्यांनी दिला, असे म्हणावे लागेल.कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ होय. मतदार संघ पुनर्रचनेत येथे अनेकदा बदल झाले असले तरी मतदारसंघाच्या नावात मात्र अद्याप बदल झालेला नाही. चव्हाण यांच्या बरोबरीने केशवराव पवार, आबासाहेब पार्लेकर, बाबूराव कोतवाल, शामराव आष्टेकर, पी. डी. पाटील यांना या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तर सध्या बाळासाहेब पाटील सलग चौथ्यांदा या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.राज्यात आणि देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून सातारा जिल्ह्यातही भाजप बाळसं धरू पाहत आहे; पण जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, याचं शल्य भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे. विक्रम पावसकरांनी भाजपच्या जिल्ह्याध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी जणू पायाला भिंगरी लावली आहे. त्याला प्रदेशचिटणीस डॉ. अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, डॉ. दिलीप येळगावकर यांच्यासह मान्यवर व पदाधिकाºयांचे सहकार्य मिळाल्यानेच आज जिल्ह्यात भाजपचे ६४५ ग्रामपंचायत सदस्य, ९१ सरपंच, ३९ नगरसेवक, ३ नगराध्यक्ष, १ उपनगराध्यक्ष, १४ पंचायत समिती सदस्य व ७ जिल्हा परिषद सदस्य अशी परिस्थिती सुधारली आहे. आता विधानसभा सदस्य वाढविण्यासाठी काही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवलेत त्यात कºहाड उत्तरचा समावेश आहे.कºहाड उत्तर मतदार संघातून सध्या वर्णे व सैदापूर गटातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य काम पाहत आहेत. तर नागठाण्याचा जिल्हा परिषद सदस्य भाजपशी संलग्न मानला जातो. शिवाय ४ पंचायत समिती सदस्यही या मतदार संघातून प्रतिनिधित्व करीत आहेत. यशवंतरावांच्या मतदार संघात जर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या चिन्हावर निवडून येत असतील तर येथे भाजपचा आमदारही होऊ शकतो, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटू लागला आहे. म्हणूनच नेत्यांनी मिशन कºहाड उत्तर सुरू केल्याचे पाहायला मिळतेय. आता चंद्रकांत पाटील यांनी घोरपडे यांच्या हातात दिलेलं ‘कमळ’ ते कसं फुलविणार? हे पाहावे लागेल!अर्थवाहिनी सुरू करण्याचा मानस...खरंतर कºहाड उत्तरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात नेहमी नवा उमेदवार रिंगणात असतो, असे पाहायला मिळते. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत शिट्टी वाजविलेले ‘घोरपडे’ याला अपवाद ठरणार, असे दिसते. भाजपच्या माध्यमातून त्यांनी तशी तयारीही केलीय. काळाची गरज म्हणून के . एम. शुगर नावाचा साखर कारखाना उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय लोकांच्या गरजा भागविण्यासाठी एक अर्थवाहिनीही सुरू करण्याचा मानस त्यांनी अनेकदा बोलून दाखविला आहे.असा आहे कºहाड उत्तर मतदारसंघकºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघात कºहाड, सातारा, खटाव अन् कोरेगाव या चार तालुक्यांतील काही भाग समाविष्ट आहे. त्यात कºहाड तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट, सातारा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट तर खटाव व कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट समाविष्ट आहेत. शिवाय कोरेगाव तालुक्यातील एक नगरपरिषदही यात समाविष्ट आहे.
‘दादा’ म्हणतील तीच ‘उत्तर’ दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:45 AM