शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गडहिंग्लजमध्येही नेत्यांचीच कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:22 AM

राम मगदूम गडहिंग्लज : 'गोकुळ' दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळात गडहिंग्लज तालुक्याचा एकही प्रतिनिधी नाही. परंतु, यावेळी सत्ताधारी आणि ...

राम मगदूम

गडहिंग्लज : 'गोकुळ' दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळात गडहिंग्लज तालुक्याचा एकही प्रतिनिधी नाही. परंतु, यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गटा-तटांची मोट बांधून 'ताकदी'चा उमेदवार निवडण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.

१९८० ते ८५ मध्ये बाळासाहेब पाटील - औरनाळकर हे संचालक होते. त्यावेळी त्यांनी गडहिंग्लजसह आजरा व चंदगडचेही प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८५ पासून काँग्रेसचे राजकुमार हत्तरकी हे सलग २८ वर्षे संचालक होते. दरम्यान, दोनवेळा अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला.

१९९० मध्ये 'गोकुळ'चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गडहिंग्लज तालुक्याला दोन जागा दिल्या. त्यामुळे कुपेकर गटाकडून तानाजीराव मोकाशी यांना संधी मिळाली. हा अपवाद वगळता गडहिंग्लजकरांच्या वाटयाला नेहमी एकच जागा मिळाली आहे.

यावेळी तालुक्यात २७३ ठरावधारक आहेत;परंतु, ते गटा-गटात विभागले आहेत. त्यामुळे मतांच्या बेरजेसाठी किमान २/३ गटांना एकत्र आणण्याची गरज आहे. म्हणूनच, यावेळी दोन्ही आघाड्यांना गडहिंग्लजमध्ये दोन जागा देण्याशिवाय पर्याय नाही.

-----------

हे आहेत इच्छुक...

सत्ताधारी आघाडीकडून-राष्ट्रवादीचे रामराज कुपेकर, काँग्रेसचे सदानंद हत्तरकी, अप्पी पाटील, भाजपचे प्रकाश चव्हाण, संजय बटकडली

-

विरोधी आघाडीकडून - राष्ट्रवादीचे महाबळेश्वर चौगुले, सतीश पाटील, अभिजित पाटील, गंगाधर व्हसकोटी व सुरेखा बाबूराव चौगुले, काँग्रेसचे सोमगोंडा आरबोळे व विद्याधर गुरबे, शिवसेनेचे बाळासाहेब कुपेकर, सिंधू प्रदीप पाटील- वाघराळीकर

हत्तरकींचे नक्की, इतरांना प्रतीक्षा..!

सत्ताधारीकडून स्व. हत्तरकी यांच्या पत्नी रेखाताई किंवा त्यांच्या स्नुषा श्वेता सदानंद हत्तरकी यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तसेच अप्पी पाटील व प्रकाश चव्हाण यांचेही जोरदार प्रयत्न आहेत. विरोधी आघाडीचे सतीश पाटील हे मुश्रीफांच्या, तर विद्याधर गुरबे हे सतेज पाटील यांच्या जवळचे आहेत. परंतु, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वांनाच माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्वाती कोरी कुणाकडून..?

विधान परिषदेच्या सलग चारही निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना साथ दिलेल्या श्रीपतराव शिंदेंनी यावेळी पहिल्यांदाच कन्या स्वाती कोरी यांच्यासाठी विरोधी आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. विधानसभेला त्यांनी मुश्रीफ व राजेश पाटील यांना मदत केली आहे. परंतु, यापूर्वी महाडिक यांनीही त्यांना 'शब्द' दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते कुणाकडून लढणार? याची उत्सुकता आहे.