कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पनवेल येथील ‘सनातन’च्या आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी साधकांच्या चेतासंस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. डॉ. तावडे व समीर गायकवाड हे नियमितपणे ही औषधे सेवन करीत होते, अशी कबुली गुन्ह्यातील साक्षीदार महिला डॉक्टर आशा ठक्कर हिने दिली आहे. या औषधांच्या साठ्याचे आवक-जावक रजिस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यातील १ ते १४ पाने फाडून गायब केली आहेत. आश्रमामध्ये १७५ साधक आहेत. त्यांच्यासाठी साडेचार हजार औषधांच्या गोळ्यांचा साठा येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही औषधे तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचे ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, तावडेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. बी. काळपगार यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. तेथून कारागृह प्रशासनाच्या आदेशानुसार त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. एसआयटी प्रमुख संजयकुमार गेले दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते. त्यांनी तावडेकडे कसून चौकशी केली.डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याचे कोल्हापूर कनेक्शन ‘सीबीआय’च्या तपासात पुढे आले होते. त्यानुसार पानसरे हत्येच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ने २ नोव्हेंबरला पुणे येरवडा कारागृहातून वीरेंद्र तावडेचा ताबा घेतला. ३ सप्टेंबरला त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता त्याने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. त्याच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल पाहून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीमध्ये विचारलेल्या प्रश्नांना त्याने बगल देण्याचा प्रयत्न केला. तावडेच्या पनवेल येथील निवासस्थानावर व ‘सनातन’ आश्रमावर ५ सप्टेंबरला छापे टाकले. यावेळी आश्रमात नार्कोटिक औषधांचा साठा आढळून आला. ही औषधे तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिसांनी संशयित तावडे याची मडगाव-गोवा बॉम्बस्फोटासाठी वापरलेली ट्रॅक्स १२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी जप्त केली. याच ट्रॅक्सचा वापर पानसरे यांच्या हत्येसाठी केल्याचे निष्पन्न झाले. तपासासाठी पोलिसांनी त्याला पनवेल, वाशिम, संकेश्वर-बेळगाव, इचलकरंजी, वारणानगरसह शहरात आठ ठिकाणी फिरविले. त्याच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चौदा दिवसांच्या कोठडीमध्ये तावडेने आजारपणाचे बहाणे करून तपास यंत्रणेस सहकार्य केले नाही. त्याच्या सांगण्याप्रमाणे जबाब नोंदविला असताही त्याने सही करण्यास विरोध केला. माझ्या वकिलांना विचारल्याशिवाय सही करणार नाही, असे म्हणून त्याने पोलिस कोठडीतील वेळेचा जाणीवपूर्वक अपव्यय केल्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी) ------------------------तिन्ही गोष्टींचा छडा नाही पानसरे यांच्यावर गोळ्या झाडणारे ते दोन तरुण, अग्निशस्त्र व गुन्'ात वापरलेली मोटारसायकल या तिन्ही गोष्टींचा अद्याप छडा लागलेला नाही. पानसरे यांच्या हत्येदरम्यान मारेकरी हे स्प्लेंडर मोटारसायकलवरून आल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना मिळाले आहे. या दोन्ही गाड्यांचे साम्य तावडेच्या मोटारसायकलशी मिळते-जुळते आहे. त्याची मोटारसायकल गायब होण्यामागे दाट संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञातस्थळी ठेवलेल्या मोटारसायकलीसह अग्निशस्त्रांचा शोधही सुरू आहे. फरार आरोपींचा ठावठिकाणा नाही संशयित तावडे याला तपासासाठी पनवेल, वाशिम, संकेश्वर-बेळगाव, इचलकरंजी, वारणानगरसह शहरात आठ ठिकाणी फिरविले. त्याच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तावडेची ट्रॅक्स पानसरे हत्येच्या तपासास वेगळी दिशा देत आहे. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे व विनय पवार, आदींचा ठावठिकाणा समीर व तावडे यांच्या चौकशीमध्ये लागलेला नाही. -----------------------समीर गायकवाडकडून जप्त केलेला मुद्देमाल समीरच्या ताब्यातून २ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅँडसेट, सांगली येथील घरातून ७ हजार ७५० रुपयांचे २३ मोबाईल हॅँडसेट व कॅमेरा ---------------------------तावडेकडून जप्त केलेला मुद्देमाल ३१४० रुपये किमतीच्या वेगवेगळ्या पाच प्रकारच्या चेतासंस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या ‘शेड्युल एच व एच-१’ गोळ्यारॅपको एजन्सीकडून सीएनसी प्रभाव असणाऱ्या वेगवेगळ्या औषधांची सात बिले. आवक-जावक रजिस्टर तीन हजार किमतीचे दोन मोबाईलसाक्षीदार डॉ. आशा ठक्कर यांनी हजर केलेला औषधांच्या स्टॉक रजिस्टरचा उतारा पान क्र. १ ते ९ चुकीची औषधे दिल्याचा आरोप तावडे याला रक्तदाबाचा त्रास आहे. त्याची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रक्तदाबाची औषधे न देता हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरची औषधे दिली आहेत. त्याचा त्रास तावडेला होऊ लागल्याने यासंबंधी येरवडा कारागृह प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती अॅड. समीर पटवर्धन यांनी दिली.
तावडेसह समीरकडूनही नार्कोटिकचे सेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 12:57 AM