गारगोटी : गारगोटीचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने शंकरराव चौगले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या मैदानात मल्ल समीर देसाई याने एक चाक या डावावर १५ मिनिटांत नाथा पावले (सांगली) याला चित्रपट केले. येथील कुस्ती मैदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.एक नंबरची संतोष दोरवड व मारुती जाधव यांची कुस्ती ५० मिनिटानंतर बरोबरीने सोडविण्यात आली. यावेळी ७५ चटकदार कुस्त्या झाल्या. मैदानी कुस्तीचे उद्घाटन आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आखाडा पूजन जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केले. प्रतिमापूजन दत्ता मोरे, भाई आबिटकर, श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. जोतिबाचे मानकरी प्रताप विजयराव चौगले यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. विजेत्या पैलवानांना प्रा. अर्जुन आबिटकर, उपसरपंच सयाजीराव देसाई, विजय सारंग, बाजीराव चव्हाण, अशोक जगताप यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.मैदान पंच म्हणून रामा माने, तुकाराम मेटल, बाजीराव पाटील, आशिक फराकटे, संग्राम देसाई, आप्पा निकम, सुरेश शिंदे, संभाजी मगदूम, आनंदा गोंधडे, गणपती बानगेकर, विलास घुगरकर, मारुती जाधव, आदींनी काम पाहिले.यावेळी शंकर सावंत, हिंदुराव कळबेकर, शंकर आबिटकर, विशाल चौगले, प्रकाश मोरे, राजन आबिटकर, राजन चिले, दशरथ राऊत, अरुण शिंदे, अल्ताफ बागवान, शिवाजी मोरे, प्रल्हाद आबिटकर, रंगराव मोरे, श्रीकांत कांबळे, चंद्रकांत चव्हाण, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदक म्हणून सर्जेराव मोरे यांनी मैदानाची रंगत वाढविली.विजेत्यांची नावे अशी निखिल गणेशपुरी, सद्दाम मुल्लानी, गजानन पाटील, योगेश तांबोळी, विठ्ठल मिकशीन, हितेंद्र कांबळे, स्वप्निल यादव, गजानन पोवार, प्रणव देसाई, अक्षय पाटील, अनिकेत परीट, प्रथमेश भाट, सुदर्शन देसाई, केदार कांबळे, वैभव मुगडे, गुरु परीट, ओमकार भोई, रोहन मोरे, यश मोरे.
समीर देसाईकडून नाथा पावले चितपट
By admin | Published: February 15, 2015 10:58 PM