शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

समीर गायकवाडची याचिका मागे

By admin | Published: February 19, 2016 1:12 AM

उच्च न्यायालयाची संमती : खटला अन्यत्र वर्ग करण्याची केली होती विनंती

कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी मागे घेतली. न्यायाधीश श्रीमती सोंडूर बलदोटा यांच्यापुढे पुनाळेकर यांनी तशी तोंडी विनंती केल्यावर न्यायाधीशांनी त्यास सहमती दिली. या खटल्याची सुनावणी दि. २३ फेब्रुवारीस होणार होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता कोल्हापुरातच होणार हे निश्चित झाले.खटल्याची सुनावणी निष्पक्षपातीपणे व्हावी, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशी याचिका (क्रमांक ८४०/२०१५) संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने गतवर्षी दि. १८ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी दि. १४ जानेवारी व दि. २ फेब्रुवारीस झाली. दि. २ फेब्रुवारीस झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश साधना जाधव यांनी सरकारी वकिलांच्या तपासातील दिरंगाईवर ताशेरे मारले होते व ‘सॉरी स्टेट आॅफ अफेअर्स...’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने या खटल्यात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांचीही नियुक्ती केली होती.उच्च न्यायालयाच्याच रेट्यामुळे पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटी, सीबीआय व कर्नाटक सीआयडी या तिन्ही यंत्रणा समन्वयाने करू लागल्या आहेत. त्यांतर्गत बुधवारीच पुण्यात या तिन्ही यंत्रणांचीच बैठक झाली व त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कोल्हापुरात येऊन पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ््यांच्या पाच पुंगळ््या व पानसरे यांच्या शरीरात मिळाळेली एक गोळी ताब्यात घेतली. त्यामुळे हा तपास आणखी काही दिवस पुढे चालणार हे स्पष्ट झाले. खटल्याची ट्रायल सुनावणी लवकर सुरू होणार नाही हे याचिकाकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी खटला अन्यत्र हलविण्याची याचिकाच तोंडी विनंती करून मागे घेतली. ही सुनावणी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कुठेतरी व्हावी अशी गायकवाड याची मागणी होती. या दाव्यात राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते.हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती..पानसरे हत्या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ वकिलांनी बाजू मांडावी; अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार पुण्याचे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला नव्हता. तो आदेश गुरुवारी निघाल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतची संभ्रमावस्थाही दूर झाली.या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा कुणाचाच कोणत्याही प्रकारचा संशयितांवर दबाव नव्हता. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याच्या मागणीस आमचा विरोध होता. आता त्यांनी स्वत:च याचिका मागे घेतल्याने त्यातील संदिग्धता आणि न्यायालयीन लढाई थोडी कमी झाली.- मेघा पानसरेपुंगळ्या, गोळीसीबीआयच्या ताब्यातअ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पथकाच्या ताब्यात दिल्या.‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेमध्ये वाढगोविंंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेत पोलिसांनी वाढ केली आहे. पूर्वी एक पोलीस कॉन्स्टेबल या मुलाच्या सुरक्षिततेसाठी होता. आता एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असे चौघेजण त्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने तैनात केले आहेत.