शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय मंगळवारी

By admin | Published: October 04, 2015 1:08 AM

गोविंद पानसरेहत्या प्रकरण

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसंबंधी निर्णयाची सुनावणी मंगळवारी (दि. ६) ठेवण्यात आली. ब्रेन मॅपिंग तपासणीवर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा निर्णय शनिवारी दिला. तपासकामात समीर गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी संशयित आरोपी समीर गायकवाड याने बारा दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केलेली नाही. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे. ही संधी मिळाली पाहिजे. यामध्ये आरोपीला कोणतीही इजा होत नाही; त्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली. त्यानंतर सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी गुन्ह्याची संपूर्ण हकीकत सांगून आजपर्यंतचा तपास न्यायमूर्र्तींसमोर विषद केला. समीर गायकवाड याचा ज्योती कांबळेशी मोबाईलवरून संवाद होत होता. त्याची गोपनीयरीत्या माहिती मिळविली असता दोघांच्या संभाषणामध्ये समीर हा पानसरे यांच्या खुनासंदर्भात बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले. त्याच्या सांगली येथील घरातून २३ मोबाईल, चाकू, डायरी व सनातन धर्माविषयी पुस्तके मिळाली. या वस्तूबांबत तो समाधानकारक उत्तरे देत नाही. समीरने ज्योती कांबळे हिच्यासोबत पानसरे हत्येसंदर्भात संभाषण झाल्याची कबुली दिली आहे; परंतु हे तो चेष्टेने बोललो असल्याचे सांगत आहे. तो चेष्टेने बोलला हे अविश्वसनीय आहे. पानसरे यांचेच नाव का घेतले आणि तेसुद्धा दोन वेळा. तसेच चौकशी सुरू असताना ‘पानसरे कोण?’ असा उलट प्रश्न त्याने पोलिसांना केला होता. चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी उत्तरे तो देत आहे. त्याच्या मानसशास्त्रीय वर्तनाची चाचणी घेतली असता ती फसवी निघाली आहे. पोलिसांनी त्याचे ध्वनिमुद्रित केलेले संभाषण आणि समीर व ज्योतीच्या आवाजाचे नमुने घेतले. बारा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपीने वाहन, हत्यारे, त्याचे इतर साथीदार यांची माहिती दिली नाही. ती त्याने टाळली म्हणून पूरक पुरावा प्राप्त करण्यासाठी ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्याचे तपासी अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. त्याला परवानगी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी मांडला. दरम्यान, संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी सर्वोच्च न्यायालयाने सेल्वी अ‍ॅँड आॅदर्स, स्टेट आॅफ कर्नाटक, दि. ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का? तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का? या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले. त्यानंतर फिर्यादीचे खासगी वकील अ‍ॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे यांनीही बाजू मांडली. यावेळी दोन्हीही बाजंूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांनी संशयित आरोपी गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीबाबत मंगळवारी (दि. ६) अंतिम सुनावणी ठेवली. ही सुनावणी ऐकण्यास पानसरे यांच्या कुटुंबीयांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समीर हजर राहणार ब्रेन मॅपिंग चाचणीची सुनावणी ६ आॅक्टोबर रोजी आहे. त्यादिवशी समीर स्वत: न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्याला ‘ब्रेन मॅपिंग चाचणीला तुझी संमती आहे का?’ अशी विचारणा केली जाईल. यावेळी त्याने नकार दर्शविल्यास हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती. त्यामुळे तो कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)