शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘देवस्थान’च्या १७ कर्मचाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे घेतले नमुने

By admin | Published: July 30, 2016 12:36 AM

जमीन गैरव्यवहार प्रकरण : सावंतवाडीच्या तिघा कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी; मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा दावा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या उदगिरी येथील शेतजमीन गैरव्यवहारप्रकरणी शिवाजी पेठेतील समितीच्या कार्यालयातील २३ पैकी १७ कर्मचाऱ्यांचे हस्ताक्षर नमुने पोलिसांनी घेतले आहेत. समितीच्या सावंतवाडी येथील कार्यालयातील तिघा लिपिकांकडे शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. शीतल इंगवले, अनिरुद्ध गुरव व दीपक म्हेत्तर अशी त्यांची नावे आहेत. आज, शनिवारीही त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याही हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीतील उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स (पेठवडगाव) या दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाला. या गैरव्यवहार प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या समितीवर पदे भूषविलेल्या काही सदस्यांचे धाबे दणाणले आहे. या भूखंड गैरव्यवहारात मोठे रॅकेट असल्याचा दावा खुद्द पोलिसांनीच केला आहेदेवस्थानचे कर्मचारी शिवाजी साताप्पा साळवी (रा. मोहिते कॉलनी, कळंबा) यांनी दोन कंपन्यांसह अनोळखी व्यक्तींच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या प्रकरणी समितीच्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश सचिव शुभांगी साठे यांना दिले. हा प्रकार समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे सदस्य व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. देवस्थानमध्ये सचिवांसह लिपिक, शिपाई, चालक व इंजिनिअर असे २३ कर्मचारी आहेत. त्यापैकी १७ जणांचे हस्ताक्षरांचे नमुने व जबाब पोलिसांनी घेतले आहेत. हा गैरव्यवहार सन २०१२ ते २०१५ या कालावधीत झाला आहे. याठिकाणी काम करणारे लिपिक शीतल इंगवले, अनिरुद्ध गुरव, दीपक म्हेत्तर यांची सावंतवाडी कार्यालयाकडे बदली आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी व शनिवार असे दोन दिवस चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने व जबाबही पोलिसांनी घेतले. देवस्थान समिती प्रशासनानेही त्यांच्याकडे चौकशी करून लेखी जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) कार्यालय सुटल्यावर फेरफारसमितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी कोणताही आदेश किंवा पत्र दिले नसताना दि. १८ आॅगस्ट २०१५ मध्ये जावक रजिस्टरमधील पान नं. २३ वर देव वशि/११२ व देव वशि १५९९/२०१५ नोंदी केल्या आहेत. हा प्रस्ताव खरा असल्याचे भासवून शाहूवाडी तहसीलदारांना सादर केला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार व रजिस्टरमध्ये ठराव घुसडण्याचा प्रयत्न समिती सदस्यांसह काही कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी केला आहे. हे धाडस करणारे चार-पाच सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत. ते कोण, हे आता चौकशीनंतर पुढे येणार आहे. या आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद करण्याची जबाबदारी लिपिक मोहिनी मोहिते यांच्याकडे आहे. देवस्थान प्रशासनाने त्यांना लेखी नोटीस पाठवून यासंबंधी खुलासा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर त्यांनी कार्यालयात ज्याठिकाणी आवक-जावक रजिस्टर ठेवण्याची कपाटे आहेत. त्यांना कुलपे नाहीत. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर कपाटांना कुलपे नसल्याने कोणीतरी त्यामध्ये फेरफार केल्याचे म्हटले आहे. या प्रकाराबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर कार्यालयातील सर्व कपाटांना आता कुलूपे लावण्यात आली आहेत.