म्हाकवे : समरजितसिंह घाटगे हे कागल तालुक्यातील जनसामान्यांसह दीनदलितांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत. युवकांच्या हाताला काम आणि महिला सक्षमीकरण हे त्यांचे व्हिजन आहे. ते राजकारणाकडे राष्ट्रधर्म म्हणून बघतात. अशी दूरदृष्टी असणाऱ्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वाला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन निपाणीच्या आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी केले. म्हाकवे (ता. कागल) येथे सिद्धनेर्ली जि. प. चे उमेदवार प्रा. सुनील मगदूम व पं. स.चे उमेदवार रूपाली पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ‘शाहू’चे संचालक पी. डी. चौगुले होते. यावेळी समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, नवोदिता घाटगे, आशालता पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष परशराम तावरे, वीरेंद्र राजे घाटगे, आदी उपस्थित होते. यावेळी समरजितसिंग घाटगे म्हणाले, पोकळ आवाहनापेक्षा आणि कृतीतूनच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची पाउले उचलणार आहोत. सवर्ण, दलित असा भेदाभेद न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून सर्वांकडे मते मागा. महावीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. रणजितसिंह पाटील, प्रा. सुनील मगदूम, रूपाली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय बंडोपंत पाटील, ए. डी. पाटील, दत्तात्रय पाटील, प्रदीप पाटील-पिंपळगावकर, अशोक पाटील, संदीप कांबळे, संजय पाटील, सुहास पाटील, उपस्थित होते. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)घाटगे हे वीजचोरीत पटाईत : मगदूमअमरीश घाटगे यांनी माझ्यावर पाणी चोरीचा आरोप केला आहे; परंतु व्हन्नूरची ती पाणी योजना आमच्या शेतातून जातच नाही. याउलट ‘अन्नपूर्णा’ पाणी योजनेच्या वीज बिलात ६९ टक्के तफावत आहे. तसा आॅडिट रिपोर्टच शासनाच्या प्रतिनिधीकडून आपण उपलब्ध केला आहे. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या पाणी योजनेत वीजचोरीचा घाट संजय घाटगे व अमरीश घाटगे यांनी घातला असल्याचे प्रा. सुनील मगदूम यांनी सांगून त्यांनी आॅडिटची प्रतच सर्वांसमोर सादर केली.
राजकारणाला ‘राष्ट्रधर्म’ मानणाऱ्या समरजित घाटगे यांना साथ द्यावी
By admin | Published: February 18, 2017 12:18 AM