शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

संध्यामठला हरवून ‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत--अवधूत घारगे स्मृती

By admin | Published: February 10, 2015 11:25 PM

फुटबॉल चषक स्पर्धा

कोल्हापूर : अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सचिन गायकवाडने केलेल्या एकमेव गोलवर बालगोपाल तालीम मंडळाने उपांत्य फेरीत धडक मारली. बालगोपाल तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर १-० गोलफरकाने मात केली. सामन्यातील लढवय्या खेळाडू म्हणून संध्यामठच्या अश्विन टाकळकर याला गौरविण्यात आले. शाहू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये सामना झाला. दोन्ही संघांनी प्रारंभापासून खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. बालगोपाल तालीम मंडळाकडून बबलू नाईक, हरीश पाटील, अक्षय मंडलिक, युवराज कुरणे; तर संध्यामठ तरुण मंडळाकडून अभिजित सुतार, आशिष पाटील, अजिंक्य गुजर, अमोल पाटील, अश्विन टाकळकर यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धात बालगोपाल तालीम मंडळाने अधिकच आक्रमक पवित्रा घेत गोल करण्यासाठी सतत खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. यामध्ये बालगोपाल तालीम मंडळाच्या श्रेयस मोरेच्या पासवर सचिन गायकवाडने हेडद्वारे गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर बालगोपाल तालीम मंडळाकडून आघाडी भक्कम करण्यासाठी, तर संध्यामठ तरुण मंडळाकडून खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांनाही गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने १ -० गोलफरकाने विजय मिळविला. आजचा सामना : शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, दुपारी ४ वा.