शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

संगीता खाडे यांची हकालपट्टी करा

By admin | Published: June 04, 2017 1:26 AM

श्रीपूजकांची मागणी : अंबाबाई मूर्ती लेपप्रकरणी श्रीपूजकांच्या बदनामीचे षड्यंत्रल्

ोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी अभिषेक बंदपासून आर्द्रता नियंत्रणात आणण्यापर्यंतच्या उपाययोजना श्रीपूजकांनी केल्या आहेत. मात्र, श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, पावित्र्य राखत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे यांनी श्रीपूजकांबद्दल बेजबाबदार वक्तव्ये करून समाजात क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची देवस्थानच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिली. ‘अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि तिची झीज’ या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी (दि. २) ‘पुरातत्त्व’चे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी मूर्ती अंतर्गतरीत्या सुस्थितीत असून, पांढगे डाग घालवून झीज रोखण्यासाठी पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल, असा निर्वाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, नगरसेवक अजित ठाणेकर, शिरीष मुनीश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. ठाणेकर म्हणाले, दानपेटी वगळता देवस्थान आणि श्रीपूजकांमध्ये कोणतेही वाद नाहीत. देवस्थान समितीवर दोन वेळा सदस्य म्हणून गेलेल्या संगीता खाडे यांच्या चुकीच्या वागण्यामुळेच पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना बाजूला ठेवले होते. आता त्यांनी हीन शब्दांत श्रीपूजकांची नाहक बदनामी केली आहे. केदार मुनीश्वर म्हणाले, श्रीपूजक, देवस्थान समिती आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अंबाबाई मूर्तीवर २०१५ साली रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली. गेल्या काही दिवसांत श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, आर्द्रतेचे नियम अमलात आणत नाहीत, असे आरोप केले. मात्र, मिश्रा यांच्यामुळेच त्यावर उत्तर मिळाले आहे. मूर्तीची झीज थांबविण्यासाठी श्रीपूजकांनीच १९७० साली व १९९७ साली अभिषेक पूर्णत: बंद केले. मात्र, त्यातील अनेक बाबी देवस्थान समितीच्या अखत्यारीत आहेत. त्या सगळ्यांची तातडीने पूर्तता करणे, फरशा काढणे, आदींसाठी काही कालावधी लागणार आहे. संवर्धन झाल्यापासून काही संस्था, संघटना विवाद निर्माण करीत आहे. हे मंदिर भक्तीचे क्षेत्र आहे, रणक्षेत्र नाही; संघटनेच्या नेत्यांनी चर्चात्मक पवित्रा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सिंग यांना परवानगी साठे यांच्याकडूनचनिवृत्त झालेल्या मनेजर सिंग यांना श्रीपूजकांनी मूर्तीला हात कसा लावू दिला? या प्रश्नावर केदार मुनीश्वर म्हणाले, सिंग खासगी दौऱ्यासाठी जात असताना कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मी सोबत संवर्धनाचे साहित्य आणले असून, मूर्तीवर थर देऊ का? असे विचारले असता माधव मुनीश्वर यांनी देवस्थानची परवानगी घ्या, असे सांगितले. त्यानंतर सिंग यांनी दोन तास देवस्थानच्या कार्यालयात तत्कालीन सचिव शुभांगी साठे यांच्याशी चर्चा केली आणि साठे यांनीच त्यांना परवानगी दिल्यानंतर आम्ही हे काम करू दिले. तेव्हा आम्हाला ते निवृत्त झाले होते हे माहीत नव्हते. मात्र, त्यांनी ही बाब सदस्यांना व प्रशासनाला का सांगितली नाही, हे आम्हाला माहीत नाही. नागचिन्हाबाबत सकारात्मकच : नागचिन्ह घडवू नये यासाठी आम्ही कोणावरही दबाव टाकला नव्हता. आम्ही व मूर्ती अभ्यासकांनीही सगळे संदर्भ, छायाचित्रे दिली होती. मॉडेल म्हणून एका कलाकाराने घडविलेली मूर्तीही ते पाहून आले. तरीही त्यांनी नागचिन्ह का घडविले नाही, हे आम्हाला माहीत नाही. त्यानंतर आम्ही नागचिन्हाबाबत समिती घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, प्रशासनाने त्यावर समितीच नेमली नाही.