नाशिक : क्र ीडा विभाग, महाराष्ट्र खो-खो संघटना व जिल्हा खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात सुरू झालेल्या कै. भाई नेरु रकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर संघाची विजयी सलामी दिली.या स्पर्धेत २४ पुरु ष व महिला संघ, १६ किशोर व किशोरी संघ सहभागी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या सामन्यांमध्ये यजमान नाशिकच्या संघाने नागपूर संघाचा १ डाव ४ गुणांनी पराभव करून विजयी सलामी दिली. नाशिकच्या संघाकडून वीर अभिमन्यु पुरस्कार विजेता स्वप्नील चिकणे याने लौकिकास साजेसा खेळ करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने नागपूरचे ४ गडी बाद केले. राकेश राजगुरू, स्वप्नील गीते यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून विजयात वाटा उचलला. शशांक तरे, सागर कोकाटे यांनी प्रत्येकी ३ मिनिटे संरक्षण केले. उर्वरीत सामन्यांचे चे निकाल खालीलप्रमाणे पुरु ष- सांगली विजयी विरु ध्द सोलापूर १५-१२ (१ डाव ३ गुण ),कोल्हापूर विजयी विरुध्द नागपूर १६-९ (१ डाव ७ गुण ) मुंबई विजयी विरु ध्द यवतमाळ -११-९ (१ डाव २ गुण ),मुंबई उपनगर विजयी विरुध्द अमरावती १५-८ ( १ डाव सात गुण), पुणे विजयी विरु ध्द सोलापूर १३-१२ (१ गुण).महिला: ठाणे विजयी विरु ध्द जळगाव १०-५ (१ डाव ५ गुण ), उस्मानाबाद विजयी विरु ध्द बुलढाणा १६-२ (१ डाव १४ गुण), मुंबई उपनगर विजयी विरु ध्द यवतमाळ ११-९ (१ डाव २ गुण) सातारा विजयी विरु ध्द कोल्हापूर १०-७ (१ डाव ३ गुण).किशोर गट : पुणे विजयी विरु ध्द सोलापूर १०-९ (१ गुण), किशोरी - अहमद नगर विजयी विरु ध्द अमरावती १०-४ (१ डाव ६ गुण) पुणे विजयी विरु ध्द कोल्हापूर ९-० ( १ डाव ९ गुण ) ठाणे विजयी विरु ध्द सोलापूर १४-९ (१ डाव ५ गुण ) सांगली विजयी विरु ध्द नागपूर १४-९ (१ डाव ५ गुण) अहमदनगर विजयी विरु ध्द पुणे १०-८ (२ गुण) वर्धा विजयी विरु ध्द कोल्हापूर ९-५ (१ डाव ४ गुण).
सांगली, कोल्हापूर संघाची विजयी सलामी
By admin | Published: March 27, 2015 11:03 PM