माने यांनी यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. महापालिकेत दोन वेळा ते नगरसेवक होते. महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात माने यांनी स्वतंत्र छाप पाडली. महापूर, कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मदत केली होती. शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या व्यापारी संघटनेचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे.
-----------------------------------------------------------
विनापरवाना वास्तव्यप्रकरणी दोन परदेशी पर्यटकांवर गुन्हा
पाचगणी (जि.सातारा) : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. व्हिसाची मुदत संपलेली असताना ते पाच महिने पाचगणीत राहिले होते.
इथोपिया देशाचे नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल हे त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील येथे वास्तव्यास राहिले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------
चिपी विमानतळ उद्घाटन तारखेचा खेळ थांबवा: परशुराम उपरकर
कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा अनेकदा विविध राजकीय व्यक्तींकडून जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही विमानतळाचे उदघाटन झालेले नाही. त्यामुळे तारखेचा हा खेळ करीत जनतेची चाललेली चेष्टा थांबवा. पहिल्यादा केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घा आणि त्यानंतरच उदघाटनाची तारीख जाहीर करा. असे आवाहन केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.
कणकवली येथे पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री असताना अनेकदा चिपी विमानतळाच्या ठिकाणी दगडी पाटी लावत त्यावर आपली नावे कोरली. तर शिवसेनेच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणेश मूर्ती आणत विमान उतरवले. शिवसेनेच्या आताच्या खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला विमानतळाचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले होते. पण अद्याप उद्घाटन होऊ शकलेले नाही. ही एकप्रकारे राज्यकर्त्यांनी जनतेची चेष्टा चालवली आहे.