कोल्हापूर : राम गणेश गडकरी सभागृहात मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत सानिया मुंगारे, सिद्धराज पाटील, तुषार शिंदे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.मंचच्या वतीने सलग सात वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नऊ ते १४ वर्षे मुले व मुली तसेच १५ ते ३५ व ३६ ते ५० अशा वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत कोल्हापूरसह, पुणे, मुंबई, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातील १३० स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, डॉ. गिरीष वझे, पोर्णिमा वझे, प्रा. एस. के. कुलकर्णी, हेमराज सामाणी, व्ही. बी. पाटील, विजय अग्रवाल, गायिका मंजुषा कुलकर्णी, डॉ. स्वप्निल रानडे, विघ्नेश जोशी, आदी उपस्थित होते.स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा नऊ ते १४ वर्षे : भावगीत : सानिया मुंगारे (चंदगड), तन्वी इनामदार (बेळगाव), रमा शिवदे (सातारा), उत्तेजनार्थ धनश्री शिंदे (पुणे), रिद्धी मारुलकर (सातारा).
नाट्यगीत : सानिया मुंगारे (प्रथम), अन्वी वालावलकर (कोल्हापूर), रमा शिवदे (सातारा), उत्तेजनार्थ : गार्गी अभ्यंकर, श्रीया पाटोळे (कोल्हापूर).
१५ ते ३५ वयोगट :भावगीत : सिद्धराज पाटील, सौरभ पाणदारे (कोल्हापूर), गायत्री कुलकर्णी (सातारा), उत्तेजनार्थ : निखील मधाळे (नेसरी), मधुरा जोशी (कोल्हापूर), तुषार शिंदे.नाट्यगीत : तुषार शिंदे (गडहिंग्लज), ऋतुजा कुलकर्णी (इस्लामपूर), वैष्णवी हजाम (अंध विद्यार्थिनी कोल्हापूर), सानिका फडके (इचलकरंजी), मधुरा जोशी (मुंबई).३६ ते ५० वयोगट :भावगीत : अनघा पुरोहित (कोल्हापूर), डॉ. सुश्रुत हार्डीकर (कोल्हापूर), दीपाली कोल्हटकर (पुणे), उत्तेजनार्थ : लता बडेकर, विप्रा आठले (कोल्हापूर).नाट्यगीत : दीपाली कोल्हटकर (पुणे), अनघा पुरोहित (कोल्हापूर).
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सविता कबनूरकर, मुग्धा देसाई, डॉ. रंजना कुलकर्णी, संगीता काणे, शरद बापट यांनी काम पाहिले. निवेद प्रा. स्नेहा फडणीस उपस्थित होते.