सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी केलेल्या चौकशीत संजय भोसले यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे त्यांची आता सुटका होणे अशक्य आहे. गेल्या अनेक वर्षात झालेल्या घरफाळा घोटाळ्याचा खरा सूत्रधार भोसलेच आहे. कर निर्धारक असताना भोसले यांनी स्वत:च्या लाभाकरिता महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान होईल, असे मोठे फेरफार केले आहेत. चौकशी समितीला चुकीची माहिती पुरविली. प्रशासनाची दिशाभूल केली, असा आरोप शेटे यांनी केला.
एका प्रकरणात निलंबित अधीक्षक अनिरुद्ध शेटे यांच्यासारख्या निर्दोष माणसाला गुंतवून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हा धक्का सहन न झाल्यामुळे शेटे आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांची तसेच त्यांच्या परिवाराची नाहक बदनामी झाली. म्हणूनच शेटे यांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून संजय भोसले यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही भूपाल शेटे यांनी केली.
सहायक आयुक्त विनायक औधकर यांनी केलेली चौकशी अत्यंत पारदर्शक व परिपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता घोटाळ्यात सहभाग असलेल्या संजय भोसले, दिलीप कोळी, शशिकांत पाटील, बापू माने या चौघांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.