कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘द बिझनेसमन फिलंथ्रॉपिस्ट ऑफ द ईअर’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे देशभरातील लाखो लोकांना त्याचा फायदा झाला, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
संजय घोडावत फाऊंडेशनने कोरोनाकाळात पाच लाखांहून अधिक लोकांना मोफत जेवण, तसेच पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर्स, जीवनावश्यक वस्तू आणि इतर मदत साहित्य पुरविले. तसेच संजय घोडावत विद्यापीठ कॅम्पसमध्ये उभारलेल्या अत्याधुनिक कोविड केअर सेंटरमधून आजवर २५ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत. कोरोनाकाळात फौंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. कोल्हापूरमधील माउली केअर या संस्थेस आर्थिक चणचणीमुळे अडचणी आल्यावर घोडावत यांच्या पाठिंब्यामुळे नवजीवन मिळाले.
फाउंडेशनने महिला सबलीकरण, शिक्षण, सॅनिटायझेशन आणि स्वच्छता, ग्रामीण विकास, क्रीडा, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य आणि आरोग्य या क्षेत्रांमध्येही चांगले कार्य केल्याबद्दल समाजात वेगळी प्रतिष्ठा मिळविली आहे.
(०९०६२०२१-कोल-संजय घोडावत)