शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

"संजय मंडलिक हेच उमेदवार, महाडिक यांनी 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 3:45 PM

गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते.

राम मगदूम 

गडहिंग्लज( जि.कोल्हापूर) : महायुतीचा 'कोल्हापूर'चा उमेदवार अजून ठरलेला नाही.परंतु,नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहुया.खासदार संजय मंडलिक हेच शिंदे गटाचे उमेदवार असे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे.खासदार धनंजय महाडिक यांना पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची आकडेवारी तोंडपाठ आहे. त्यांनी आता 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी,असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला. रिंगरोड आणि बायपास रस्त्याशिवाय शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माझाही चांगली ओळख आहे. त्यांच्याकडे जाताना महाडिक यांनी मलाहीसोबत न्यावे, म्हणजे संकेश्वर - आंबोली महामार्गाप्रमाणे रिंग रोडचे कामही नक्कीच मार्गी लागेल.

महाडिक म्हणाले,  ७० वर्षात कॉंग्रेसने प्रत्येक निवडणुकीत रस्ते, वीज,पाणी देण्याची आणि गरीबी हटविण्याची केवळ आश्वासनेच दिली.परंतु, प्रत्यक्षात काहीच दिले नाही.लोकांच्या खऱ्या गरजा ओळखलेल्या मोदींनी ते अवघ्या १० वर्षात करून दाखवले.

मंडलिक म्हणाले,उपजिल्हयाचे ठिकाण म्हणून गडहिंग्लज शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज आहे.निवडणूका येतील आणि जातील.परंतु, विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा आशीर्वाद द्यावा.

कार्यक्रमास प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर, हेमंत कोलेकर,सतीश पाटील, वसंत यमगेकर, रमेश रिंगणे,नरेंद्र भद्रापूर, प्रकाश पताडे,अनुप पाटील,अमर मांगले,मंजुषा कदम,उर्मिला जोशी आदी उपस्थित होते. यावेळी किरण कदम, सिध्दार्थ बन्ने, महेश सलवादे यांचीही भाषणे झाली.गुंडया पाटील यांनी स्वागत केले.सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. रश्मीराज देसाई यांनी आभार मानले.

'रिंग रोड'साठी दिल्लीतून निधी आणूपालकमंत्री मुश्रीफ यांनी गडहिंग्लजला शंभर कोटींचा निधी दिला,त्यातील ५५ कोटींच्या कामांचा प्रारंभ हा ऐतिहासिक दिवस आहे.झपाटयाने वाढत्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तयार करावा.मी आणि संजयदादा दोघेही दिल्लीला जाऊन गडकरींचा शर्ट धरुन रिंग रोड साठी निधी आणून देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफNarendra Modiनरेंद्र मोदी