शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

संजय मंडलिकांना कार्यकर्त्यांचा गराडा ;पालकमंत्र्यांनी भरवला पेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 4:34 PM

नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांना शुभेच्छा देण्यासाठी रुईकर कॉलनीतील बंगल्यात शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतन खासदारांना पेढा भरवून तोंड गोड केले.

ठळक मुद्दे‘दादा...आता मंत्रीपदाच बघा’ अशी प्रेमळ गळ उपस्थित कार्यकर्त्यांनी घालत वातावरणात आणखी उत्साह आणला.

कोल्हापूर : नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांना शुभेच्छा देण्यासाठी रुईकर कॉलनीतील बंगल्यात शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतन खासदारांना पेढा भरवून तोंड गोड केले. ‘दादा...आता मंत्रीपदाच बघा’ अशी प्रेमळ गळ उपस्थित कार्यकर्त्यांनी घालत वातावरणात आणखी उत्साह आणला.खा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार मतांची आघाडी घेत, ऐतिहासिक विजय मिळविला.

भाजप-शिवसेना महायुतीसह कागलच्या मंडलिक गटात या विजयाने स्फूर्लींग भारले. गुरूवारी (दि.२३) दुपारी बारा वाजता लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होताच रुईकर कॉलनीतील मंडलिक निवास गर्दीने फुलून गेले. रात्री दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सव्वासात वाजता प्रा. मंडलिक हॉलमध्ये आले. यानंतर कागल, मुरगुड, चंदगड, शहरातील कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देवून सदिच्छा व्यक्त केल्या.दहा वाजता पालक मंत्री चंद्रकांत पाटील आले. त्यांनी प्रा. मंडलिक यांना पेढा भरवत आनंद व्यक्त केला. महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने राबल्यानेच विजय मिळाला. महायुतीची ही ताकद यापुढेही दिसेल, अशी उभयतांमध्ये चर्चा झाली.

यावेळी विद्याप्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यी संदीप देसाई, व्ही. बी. पाटील, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, माणिक मंडलिक, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, सुनिल मोदी उपस्थित होते. प्रा. मंडलिक यांना भेटण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. वैशाली मंडलिक यांना भेटून महिला आनंद व्यक्त करीत होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत व त्यानंतर रात्री उशीरापर्यंत कार्यकर्त्यांची वर्दळ होती.राष्टय नेतृत्वान आता तरी ध्यानात ठेवावप्रा. मंडलिक म्हणाले, दिवगंत सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात २००९साली राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जीवाचं रान करुनही हताश व्हाव लागल. यातून कोणताही धडा न घेता, २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेन ठरविलं असतानाही मी ध्यानात ठेवलय असे म्हणत, राष्टय नेतृत्वानं सहा-सहावेळा दौरा केला. आतातरी २०१९च्या कोल्हापूरातून या नेतृत्वाना धडा घेवनू ध्यानात ठेवाव. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर