शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिवसेनेतून संजय पवार यांची हकालपट्टी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 4:21 PM

विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल पक्षाकडे पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

ठळक मुद्देशहर कार्यकारीणीत मागणी : पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा निर्णय

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या दुर्गेश लिंग्रस व कमलाकर जगदाळे यांना पाठीशी घालून त्यांना अप्रत्यक्ष साथ देणाºया जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी एकमुख मागणी शिवसेनेच्या शहर कार्यकारीणीने गुरुवारी केली. पवारांसह संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

शाहू स्मारक भवन येथे शिवसेना शहर कार्यकारीणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहरप्रमुख रविकिरण इंगवले होते.शिवसेना पक्षाशी वेळोवेळी गद्दारी करणा-या आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे आदी गद्दारांना फूस लावून पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभागी करून घेणाºया जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या पक्ष निष्ठेची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर व त्यांच्यासोबत असणाºया गद्दार टोळक्यावर कारवाई करावी, अशी एकमुख मागणी या बैठकीत पदाधिका-यांनी केली.

यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, रणजीत जाधव, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, दीपक गौड, प्रकाश सरनाईक, विशाल देवकुळे आदी पदाधिका-यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

या सर्वांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात केलेल्या कामाचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना भेटून सादर करणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले. राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचार करण्याचे काम या टोळक्याने केले आहे. विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल पक्षाकडे पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण त्याच गद्दारांना पुन्हा पक्षाच्या कार्यक्रमात घेणा?्या जिल्हाप्रमुख यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित होत आहे, असा टोला इंगवले यांनी लगावला.यावेळी जयवंत हारुगले, अंकुश निपाणीकर, गजानन भुर्के, रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.जिल्हाप्रमुखांच्या गद्दारीची अनेक उदाहरणेगेल्या काही वर्षात जिल्हाप्रमुख पवार यांच्या गद्दारीची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पंचायत समिती निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात तानाजी आंग्रे यांना बंडखोरी करायला लावून पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करणे. शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या अंगावर धाऊन जाण्याचा अशोभनीय प्रकार या जिल्हाप्रमुख व त्यांच्या टोळक्याने केला आहे, असा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर