कोल्हापूर - खंडणी, खून, सावकारी, मारामारी आदी १७ गुन्हे दाखल असलेला आणि डबल मोक्का कारवाई नंतर, मे २०१९ पासून फरार असलेला, तसेच इचलकरंजीसह परिसरात दहशत माजवलेला एसटी सरकार गॅंगचा म्होरक्या, नगरसेवक संजय तेलनाडे याला पुण्यातील आंबेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक शैलैश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सुनील तेलनाडे बंधूं पैकी गॅंगचा म्होरक्या संजय तेलनाडे याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. इचलकंजी शहर व परिसरात दहशत माजविणाऱ्या गॅंगविरुद्ध खंडणी भूखंड फसवणूक अत्याचार आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधूसह गॅंगविरुद्ध 18 मे 2019 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
यानंतर तेलनाडे बंधूसह साथीदार पसार झाले होते. साथीदारांच्या वाढत्या कारनाम्यांनंतर गॅंगवर दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे व त्यांच्या पथकाने केली.