जागतिक मुद्रक दिनानिमित्त घेतलेल्या मेळाव्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा प्रारंभ झाला. या संघाच्या सचिवपदी सुनील नसिराबादकर, खजानीसपदी निहाल शिपूरकर यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी प्रदीप पडवळे, सतीश पाध्ये, मानसिंग पानसकर, अंजुम तांबोळी, प्रकाश करंबळेकर, संजय रणदिवे, रणजित पवार, कुणाल पाटील, सिद्धेश पाटील, अनिल मोहिते, ओंकार चव्हाण, स्वानंद गोसावी यांची निवड झाली. विविध कामांची पूर्तता करण्यासाठी सुनील नसिराबादकर, अंजुम तांबोळी, अभिजित पडवळे यांची समिती नियुक्त करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रदीप पडवळे यांनी स्वागत केले. सुनील नसिराबादकर यांनी आभार मानले.
प्रतिक्रिया
मुद्रण शास्त्र आणि व्यवसायातील तंत्रज्ञानाबाबतचे सर्व बदल आत्मसात करण्यासाठी मुद्रण व्यवसायातील बांधवांचा मेळावा घेणार आहे. जिल्हा मुद्रक संघाच्यावतीने कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- संजय थोरवत
फोटो (०२०३२०२१-कोल-संजय थोरवत (मुद्रक दिन), अभिजित पडवळे (मुद्रक दिन), सुनील नसिराबादकर (मुद्रक दिन), निहाल शिपूरकर (मुद्रक दिन)