खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील प्रमुख मार्गावर हायपो क्लोराईडचा वापर करून औषध फवारणी केली.
सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर दिवसभर ती बंद असल्याने रस्ते निर्मनुष्य बनले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने बससेवा ठप्प झाली होती. कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. मात्र, सध्या प्रवासी घरात व बस रस्त्यावर रिकाम्या फिरताना दिसत आहे.
दरम्यान, शहरातील मार्केट यार्ड परिसरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पालिकेने विशिष्ट नियमावली तयार करून दिली. सुरक्षित अंतरावर पट्टे मारून भाजीपाला विक्रीस व्यापाऱ्यांना मुभा दिली आहे. मार्केड यार्ड परिसरात पोलीस प्रशासन, महसूल व आरोग्य विभागाकडून ग्राहक व विक्रेत्यांची कोविड तपासणी करूनच यार्डात प्रवेश दिला जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने जनावरांचा बाजार बंद केला आहे. तसेच महाराष्ट्रातून शहरात येणाऱ्या दुचाकी वाहनांना मज्जाव केला आहे. मार्केट यार्ड परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे.
------------------------
* फोटो ओळी : संकेश्वरमध्ये लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे रविवारी बाजारपेठेत असा सन्नाटा होता.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०१