संकेश्वर : येथील शंकराचार्य संस्थान मठाचे श्री विद्या शंकर भारती देव गोसावी स्वामींच्या आराधनेनिमित्त १९ ते २२ अखेर रथोत्सव व यात्रा होत आहे. यानिमित्त शुक्रवारी (१९) सकाळी ९ वाजता रथपूजा, शनिवारी (२०) रथ दुपारी २ वाजता नारायण मंदिराकडे, तर रविवार (२१) रथाचा मुक्काम व सोमवार (२२) रथ पुन्हा विधिवत मठाकडे आणण्यात येणार आहे
---------------------------
२) संकेश्वरमध्ये रविवारी धावणे स्पर्धा
संकेश्वर : येथील शंकराचार्य रथोत्सवानिमित्त अचानक तरुण मंडळातर्फे रविवार (२१) सकाळी ९ वाजता धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या ७ विजेत्यांना अनुक्रमे ६००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ व ५०१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
---------------------------
३) संकेश्वरात सुसज्ज वसतिगृह उभारणार
संकेश्वर : शहरातील जुन्या पी. बी. रोडलगत तरडे प्लॉट येथील ७ गुंठे जागेत शालेय मुलांसाठी तीनमजली सुसज्ज वसतिगृह बांधण्यात येणार आहे. वसतिगृह बांधकाम पायाभरणीचा प्रारंभ अन्न व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते झाला. मागासवर्गीय खात्यातर्फे बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. याकामी ३ कोटी २६ लाखाचा निधी खर्ची पडणार आहे.