वाई : वाई हत्याकांडातील कोल्ड ब्लडेड, सीरियल किलर संतोष पोळ लायडिटेक्टर व नार्को चाचणी करण्यासाठी न्यायालयासमोर तयार झाला़ ‘माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ज्या चाचण्या करणे गरजेचे आहे, त्या सर्व करण्यास माझी हरकत नाही,’ असे संतोषने न्यायाधीशांना सांगितले़ संतोष पोळने सहा खून केल्याचे पोलिस तपासात सांगितले. मात्र, त्याने तपासकामात पोलिसांना सहकार्य केले नाही़ त्याने आणखी खून व काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या असहकार्यामुळेच पोलिसांनी न्यायाधीश आर. के. थोरात यांच्याकडे पोळची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ व लायडिटेक्टर चाचणी करण्याची परवानगी मागितली. याबाबत निर्णय देण्याअगोदर न्यायालयाने संतोष पोळ व त्याचे वकील औरंगाबादकर यांच्याकडे विचारणा केली़ त्यानंतर संतोषने त्याच्या वकिलांशी चर्चा करून चाचण्यास तयार असल्याचे सांगितले़ यावर न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.वनिता गायकवाड यांच्या खून प्रकरणात न्यायालयाने बुधवारी फक्त एक दिवसाचीच पोलिस कोठडी दिली होती़ गायकवाड यांच्या खुनातील हत्यारे, सोने व साथीदाराचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी मिळालेली पोलिस कोठडी अपुरी आहे. ती वाढवून मिळावण्याबाबत तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी न्यायालयाकडे मागणी केली़ सरकारी वकील सोनावणे यांनीही तशीच मागणी केली़ पोळचे वकील मकरंद औरंगाबादकर यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘पोलिसांनी कोठडी मागताना बुधवारची कारणे रिमांड यादीत दिली आहेत़ हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. परंतु पोळ आॅगस्टपासून पोलिस कोठडीत आहे़ तेव्हापासून पोलिसांनी तपास केला आहे. त्यामुळे आणखी पोलिस कोठडी वाढवून देण्यात येऊ नये.’न्यायालयाने त्याची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ त्यानंतर पोलिसांनी पुढील गुन्'ात तपासासाठी पोळला ताब्यात घेण्यास न्यायालयाची परवानगी मागितली़ त्याप्रमाणे डॉ. घोटवडेकर यांच्या रुग्ण्वाहिका चोरीप्रकरणी पोळला पोलिस ताब्यात घेणार आहेत़ गुरुवारच्या सुनावणी वेळी पोळची पत्नी दोन वर्षांच्या मुलाला घेऊन न्यायालयात आली होती़ (प्रतिनिधी)
‘लायडिटेक्टर अन् नार्को’साठी संतोष तयार
By admin | Published: September 30, 2016 12:47 AM